आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाने विशेष मोहीम 3.0 अंतर्गत अनावश्यक वस्तू निकाली काढत कार्यस्थळ कामकाजासाठी अधिक उत्तम बनवण्याची कामगिरी केली साध्य
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2023 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2023
आयुष मंत्रालयाने विशेष मोहीम 3.0 अंतर्गत अनावश्यक वस्तू निकाली काढत कार्यस्थळ कामकाजासाठी अधिक उत्तम करण्यात आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे. विशेष मोहीम 3.0 मध्ये नमूद केलेले आणखी टप्पे गाठण्यासाठी मंत्रालय सातत्याने प्रयत्न करत आहे.
याच तयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयाने 2 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या देशव्यापी विशेष मोहिम 3.0 साठी खालील प्रलंबित कामे निश्चित केली: खासदारांचे संदर्भ 30, संसदीय आश्वासन 17, राज्य सरकार 3, सार्वजनिक तक्रारी 75, पंतप्रधान कार्यालय संदर्भ 3, सार्वजनिक तक्रार अर्ज 24, फाइलींचे व्यवस्थापन 305, आणि स्वच्छता मोहीम 20. परिणामी, फायली निकाली काढण्याशी संबंधित मोहिमेमध्ये तिसऱ्या आठवड्यात बरीच प्रगती दिसून आली. पुनरावलोकनासाठी असलेल्या 305 फाइलींपैकी 161 फाइलींचे पुनरावलोकन केले गेले आणि पुनरावलोकन केलेल्या 161 फाइलींपैकी सर्व फायली काढून टाकण्यात आल्या.
विशेष मोहीम 3.0 चा अधिकृत प्रारंभ 15 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभिक टप्प्यापासून सुरू झाला. या प्रारंभिक टप्प्यात संपूर्ण देशभरात स्वच्छतेचे लक्ष्य निश्चित करण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर 2 ऑक्टोबरपासून मोहिमेच्या अंमलबजावणीचा टप्पा सुरू झाला. मोहिमेदरम्यान, जागा व्यवस्थापन आणि कार्यस्थळे अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला जात आहे. मोहीम 3.0 ही स्वच्छतेची सर्वोच्च मानके राखण्यासाठी आणि यासंबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी नवीनतम पाऊल आहे.
मोहिमेदरम्यान आयुष मंत्रालयाच्या कार्यालयांचे सुशोभीकरण आणि अनावश्यक वस्तू काढून टाकण्यावर भर दिला जात आहे. कर्मचाऱ्यांसाठी कार्यस्थळाची परिणामकारकता आणि उत्पादकता वाढवणे, हे या प्रयत्नांमागचे उद्दिष्ट आहे.
'स्वच्छता ही सेवा' पंधरवड्याचा भाग म्हणून स्वच्छ आणि कचरामुक्त भारताचे महत्त्व अधोरेखित करत आयुष मंत्रालयाने, मंत्रालयात आपल्या सर्व अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी आढावा घेतला आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोहिमेच्या कालावधीत लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. यासाठी समर्पित पथकाद्वारे दैनदिन प्रगतीवर लक्ष ठेवले जात आहे. संस्था, परिषदांनी त्यांचा परिसर, लगतचा परिसर तसेच बस थांबा, उद्याने, वनौषधी उद्यान, तसेच तलाव अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. वरिष्ठ अधिकारी आणि आयुष मंत्रालयाशी संबंधितांनी मोहिमेचा भाग म्हणून आयुष भवन आणि संबंधित परिसराची स्वच्छता केली.
मोहिमेनुसार, आयुष मंत्रालयाने विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश, संशोधन परिषदा, राष्ट्रीय संस्था, अधीनस्थ संस्था आणि इतर वैधानिक संस्थांना संबंधित कामांचे निरीक्षण करण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी यापूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे उल्लेखनीय यश मिळाले आहे आणि मंत्रालय एकूण क्रमवारीत सुधारणा करण्यास सक्षम आहे.
कार्यस्थळ कामकाजासाठी अधिक उत्तम करण्यासाठी, स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अतूट वचनबद्धतेसह विशेष मोहीम 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.
* * *
M.Pange/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1969693)
आगंतुक पटल : 133