पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पॅलेस्टिनी अध्यक्षांसोबत चर्चा
गाझामधील अल् अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधानांनी या भागातील दहशतवाद, हिंसाचार आणि खालावत चाललेल्या सुरक्षाविषयक स्थितीबद्दल व्यक्त केली चिंता
इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्यावर भारताच्या प्रदीर्घ काळापासूनच्या आणि सैद्धांतिक भूमिकेचा केला पुनरुच्चार
राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी भारताच्या पाठिंब्याबद्दल मानले पंतप्रधानांचे आभार आणि भारताच्या भूमिकेची केली प्रशंसा
भारताकडून पॅलेस्टिनी जनतेसाठी मानवतावादी मदत पाठवणे सुरुच राहील अशी पंतप्रधानांची ग्वाही
प्रविष्टि तिथि:
19 OCT 2023 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महामहीम महमूद अब्बास यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली.
गाझामधील अल् अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
भारत आणि या प्रदेशादरम्यान असलेले अतिशय घनिष्ठ आणि ऐतिहासिक संबंध अधोरेखित करत पंतप्रधानांनी या प्रदेशातील दहशतवाद, हिंसाचार आणि खालावत चाललेल्या सुरक्षाविषयक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.
इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्यावर भारताच्या प्रदीर्घ काळापासूनच्या आणि सैद्धांतिक भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी या परिस्थितीबाबतचा त्यांचा दृष्टीकोन पंतप्रधानांना सांगितला. त्यांनी भारताच्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आणि भारताच्या भूमिकेची प्रशंसा केली.
भारताकडून पॅलेस्टिनी जनतेसाठी मानवतावादी मदत पाठवणे सुरुच राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती व्यक्त केली.
* * *
R.Aghor/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1969234)
आगंतुक पटल : 178
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam