पंतप्रधान कार्यालय
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
18 OCT 2023 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल वहीदा रहमान जी यांचे विशेष अभिनंदन पंतप्रधानांनी केले आहे.
भारताच्या राष्ट्रपतींनी केलेल्या X पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:
“69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्वांचे अभिनंदन. प्रत्येक पुरस्कारप्राप्त व्यक्तीने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिले आहे. वहिदा रहमान जी यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करू इच्छितो.”
* * *
R.Aghor/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1968887)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati