ऊर्जा मंत्रालय

इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब आणि उपलब्धतेच्या अग्रीम अंदाजासंदर्भातील माहितीसाठी केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्र्यांच्या हस्ते डॅशबोर्डच्या प्रारंभ

Posted On: 16 OCT 2023 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2023

 

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे  नवीन ईव्ही-रेडी इंडिया डॅशबोर्डचा (evreadyindia.org) प्रारंभ केला. तज्ज्ञ गटाच्या ओएमआय फाउंडेशनमधील धोरण आणि उद्योग तज्ञांनी विकसित केलेला हा डॅशबोर्ड हा एक विनामूल्य डिजिटल मंच आहे. या मंचाच्या माध्यमातून प्रत्यक्ष वेळेतील इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब आणि उपलब्धतेचा अग्रीम अंदाज, संबंधित बॅटरीची मागणी, चार्जिंग घनता आणि बाजारातील वाढीचा कल  यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

डॅशबोर्डने उद्योग, धोरणकर्ते आणि इलेक्ट्रिक वाहनांचे अंतिम वापरकर्ते यांच्यासाठी लोकांमध्ये अधिकाधिक समावेशाच्या संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. हा मंच, माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या  सामर्थ्याचा लाभ देतो आणि भारताच्या मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रासंदर्भातील  मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि विश्लेषणाची आवश्यकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

या कार्यक्रमात डॅशबोर्डसंदर्भातील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे; येथे ही पुस्तिका पाहता येईल.

उद्घाटन सोहळा येथे पाहता येईल

 

या उद्घाटन समारंभामध्ये केंद्र आणि राज्य सरकार, उद्योग, जागतिक बँक आणि इतर हितसंबंधितांच्या  प्रतिनिधींना संबोधित करताना, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणाले की, भविष्य हे इलेक्ट्रिक ऊर्जेचे असणार आहे. याला कोणीही रोखू शकत नाही. साठवणूक बॅटरीची  किंमत कमी होईल आणि एकदा ती कमी झाली की डिझेल आणि पेट्रोल एसयूव्ही इतिहासजमा होतील. आपल्याकडे इलेक्ट्रिक वाहने असतील, जी जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून आपल्या प्रवासाशी सुसंगत असतील.”

एक देश म्हणून भारतासाठी इलेक्ट्रिक वाहतुकीकडे  वळणे अत्यंत आवश्यक आहे, असे म्हणाले. आपल्याला पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरून तिसऱ्या क्रमांकावर जायचे आहे आणि धोरणात्मक बाबींमध्ये आपले सामर्थ्य  वाढवायचे आहे. यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे मुख्य कारण असलेले ऊर्जा स्वातंत्र्य आवश्यक आहे'' , असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांनी वाहतूक क्षेत्रामधील कार्बन उत्सर्जन कमी  करण्याच्या महत्त्वावर भर दिला

डॅशबोर्डवर इथून प्रवेश करता येईल: https://evreadyindia.org/

You may also like to check this out:

  1. https://powermin.gov.in/en/content/electric-vehicle
  2. Centre sanctions Rs. 800 crores under FAME Scheme Phase II for 7432 public fast charging stations
  3. Three schemes launched and several steps taken by the Centre to promote adoption of electric vehicles in India
  4. ELECTRIC VEHICLES
  5. EVs purchased under FAME INDIA scheme

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1968211) Visitor Counter : 81