आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी पीएम-अभिम, एनएचएम आणि एक्सव्ही-एफसी आरोग्य अनुदान अंतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पांचे केले उद्घाटन


डॉ. मांडविया यांनी अतिदक्षता विभाग, एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, सार्वजनिक आरोग्य एकक विभाग आणि सामुदायिक आरोग्य केंद्राची पायाभरणी केली

Posted On: 15 OCT 2023 6:35PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पंतप्रधान- आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (PM-ABHIM), राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) या अंतर्गत विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले ,तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या आरोग्य अनुदानाचे हस्तांतरण केले.

आसाम मधील गुवाहाटी येथे आज झालेल्या कार्यक्रमात आसामचे आरोग्यमंत्री केशब महंता हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना डॉ. मनसुख मांडविया यांनी " आरोग्य क्षेत्रामध्ये अमृत काळातझालेले लाक्षणिक बदल आणि 2047 सालचा अमृत काळ विमर्श विकसित भारत" याविषयीच्या विकास विषयक चर्चेत सहभागी होताना भाषण केले.

यावेळी बोलताना डॉ . मांडविया सांगितले की, "आम्ही आमच्या आरोग्य सेवा प्रणालींना बळकट करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत.त्या प्रयत्नांमुळे साथीच्या रोगाचा सामना करताना त्यांची  भूमिका सुनिश्चित करण्यासाठी आणि देशाच्या सर्वदूर भागात आरोग्य सेवा परवडणारी असेल याची शाश्वती होईल.तसेच त्यात सुलभता प्रदान करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीची खरी क्षमता वापरणे आवश्यक आहे."

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणाली द्वारे सामील झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा पुनरुच्चार करताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, “एक निरोगी समाज निरोगी राष्ट्राची निर्मिती करतो जो समृद्ध देशाचा पाया घालतो.  भारत एक शाश्वत परिसंस्था विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे जी उत्कृष्टता आत्मसात करणारी असेल.

"अचानक उद्भवलेल्या कोणत्याही आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीचा धैर्याने सामना करण्यासाठी आपल्या मनुष्यबळाच्या योग्य वापर करता यावा म्हणून पीएम-अभिम ची स्थापना झाली." असं त्यांनी यावेळी सांगितले.

या मेळाव्याला संबोधित करताना, डॉ. मांडविया यांनी आसाममधील आरोग्यसेवा विकास उपक्रमांचे कौतुक केले आणि सांगितले की, "आम्हाला संशोधन आणि विकास आणि हील इन इंडिया, हील बाय इंडिया सारख्या उपक्रमांना प्राधान्य देताना मजबूत आरोग्य सेवांसाठी पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकास साधायचा असून  आरोग्यसेवा परवडणारी आणि सुलभ बनवण्याची गरज आहे".  समन्वय साधण्याची आणि एकजुटीने काम करण्याची गरज अधोरेखित करताना, केंद्रीय मंत्री म्हणाले की "आरोग्य सेवा पायाभूत सुविधांचे विभाग, जिल्हा आणि प्रादेशिक स्तरावर एकीकरण मजबूत केले पाहिजे जेणेकरून आपल्या देशात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही नवीन रोगाच्या प्रकारावर किंवा रोगावर पाळत ठेवली जाईल."

डॉ. मांडविया यांनी आसाममध्ये वैद्यकीय, दंत आणि नर्सिंग महाविद्यालयांच्या वाढीचे कौतुक करून या विषयासंदर्भात उपक्रमांचे स्मरण करून ते म्हणाले की, “आपले राष्ट्र, अगदी कठीण काळातही आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल याची खात्री करतो आणि सरकारच्या याविषयक सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये हा समारंभ महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.” 

***

G.Chippalkatti/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1967962)