रेल्वे मंत्रालय
विशेष मोहीम 3.0 दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने गाठलेली विविध उद्दिष्टे
1 ऑक्टोबर 2023 पासून विशेष मोहीम 3.0 सुरू करण्यात आली
कार्यालयीन भंगाराच्या विक्रीतून 66.83 लाख रुपयांचे (अंदाजे) उत्पन्न
या कालावधीत 5,297 हून अधिक स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या.
भंगार वस्तूंच्या विल्हेवाटीकडे विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे 397619 चौरस फूट कार्यालयीन जागा मोकळी करण्यात यश
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2023 2:13PM by PIB Mumbai
रेल्वे मंत्रालयाने विशेष मोहीम 3.0 पूर्ण उत्साहात आणि जोमाने संपूर्ण भारतभर पसरलेल्या भारतीय रेल्वेच्या विभागीय मुख्यालये, विभागीय कार्यालये, उत्पादन युनिट्स, आरडीएसओ, प्रशिक्षण संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि 7000 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर हाती घेतली आहे.
रेल्वेने 31.10.2023 पर्यंत 10,722 स्वच्छता मोहिमेचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेदरम्यान, कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या भंगारातल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आणि 3,18504 चौरस फूट जागा मोकळी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी, 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत या मोहिमेदरम्यान 5,297 हून अधिक स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. याच मोहिमेदरम्यान 1.02 लाखांहून अधिक सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान, कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या भंगरातल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले, ज्याच्या माध्यमातून 397619 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आणि या कार्यालयीन भंगाराची विल्हेवाट लावून 66.83 लाख रुपयांचा(अंदाजे) महसूल जमा झाला आहे.
पुनर्रमुद्रित आणि नकोशा असलेल्या फाइल्सची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने 51,954 पेक्षा जास्त फाइल्सचे पुनरावलोकन केले गेले आहे.



***
G.Chippalkatti/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1967899)
आगंतुक पटल : 190