मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय पोल्ट्री उद्योग एव्हियन इन्फ्लूएंझापासून मुक्त झाल्याच्या स्वयंघोषणेला जागतिक पशु आरोग्य संघटनेने दिली मान्यता

Posted On: 14 OCT 2023 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑक्‍टोबर 2023

 

ही एक मोठी बातमी असून आमच्या पोल्ट्री क्षेत्रासाठी निर्णायक ठरेल असे केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी चेन्नई येथून सागर परिक्रमा कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याची सुरुवात करताना माध्यमाशी संवाद साधताना सांगितले.

भारतातील विशिष्ट पोल्ट्री कंपार्टमेंटमध्ये अत्यंत रोगजन्य एव्हियन इन्फ्लुएंझा (HPAI) पासून मुक्तता झाल्याच्या स्वयंघोषणेला जागतिक पशु आरोग्य संघटनेने मान्यता दिली असून भारतीय पोल्ट्री क्षेत्रासाठी ही एक अतिशय महत्वाची घडामोड आहे.  पशु आरोग्य आणि जैवसुरक्षा याबाबत उच्च दर्जा राखण्याची भारताची वचनबद्धता यातून दिसून येते. 

  

 

क्षेत्र निश्चिती आणि विभागीकरणाची पार्श्वभूमी

क्षेत्र निश्चिती आणि विभागीकरण ही धोरणात्मक साधने असून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि रोग प्रतिबंध किंवा रोग नियंत्रणाच्या उद्देशाने विशिष्ट आरोग्य स्थिती असलेल्या प्राण्यांच्या गटांची स्थापना आणि देखरेख करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. विभागीकरणामध्ये राष्ट्रीय प्रदेशात विशिष्ट आरोग्य स्थिती असलेल्या प्राण्यांची उप-लोकसंख्या परिभाषित करणे समाविष्ट आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवणे हे  जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या स्थलीय संहिता (अध्याय 4.4 आणि 4.5) आणि विशिष्ट रोग प्रकरणांशी संबंधित शिफारशींमध्ये नमूद केलेल्या मानकांचे पालन करणाऱ्या कठोर व्यवस्थापन आणि पालन पद्धतींवर अवलंबून आहे.

भारतातील एव्हियन इन्फ्लूएंझा

अत्यंत रोगजन्य एव्हियन इन्फ्लुएंझा (एच पी ए आय), जो सामान्यत: बर्ड फ्लू म्हणून ओळखला जातो, तो भारतात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी 2006 मध्ये आढळला होता. तेव्हापासून, देशाने विविध क्षेत्रांमध्ये एच पी ए आय चा उद्रेक दरवर्षी अनुभवला आहे, त्यामुळे  मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या रोगाची नोंद झाली आहे, परिणामी त्याच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी  9 दशलक्ष पक्षी मारले गेले आहेत.

भारतात  एच पी ए आय नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा एव्हियन इन्फ्लूएंझा (सुधारित - 2021) मध्ये प्रतिबंध, नियंत्रण आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी नमूद केल्यानुसार "शोधा आणि बाजूला काढा" धोरणाचे अनुसरण केले जाते. या सर्वसमावेशक प्रतिसादामध्ये संक्रमित प्राणी आणि त्यांच्या सानिध्यात आलेले प्राणी, अंडी, खाद्य, कचरा आणि इतर दूषित पदार्थांचा मानवी पद्धतीने नाश करणे यांचा समावेश आहे.  याव्यतिरिक्त, पोल्ट्री आणि पोल्ट्री उत्पादनांच्या हालचालींवर प्रतिबंध, निर्जंतुकीकरण आणि संक्रमित परिसर स्वच्छ करणे आणि पोस्ट-ऑपरेटिव्ह देखरेख योजना  (POSP) यासारख्या उपायांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एच पी ए आय विरुद्ध लसीकरणास भारतात परवानगी नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

विभागीकरण : एक प्रमुख उपाययोजना

अनेक आव्हाने असून देखील भारताने पोल्ट्री विभागीकरणाची संकल्पना स्वीकारून एच पी ए आय शी निगडित धोके कमी करण्याच्या उद्देशाने सक्रिय दृष्टीकोन स्वीकारला आहे. प्राण्यांचे आरोग्य चांगले राहावे, विभागाच्या आत आणि बाहेर रोगाचा उद्रेक होण्याचा धोका कमी व्हावा आणि पोल्ट्री आणि पोल्ट्री उद्योगाशी संबंधित व्यवहार सुरळीत सुरु राहावेत यासाठी विभागीकरण हा एक अत्यंत महत्वाचा उपाय आहे.

जागतिक पशु आरोग्य संघटनेनेद्वारे स्व-घोषणेला मिळालेली मान्यता

भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने जागतिक पशु आरोग्य संघटनेला (WOAH) भारतातील  26 पोल्ट्री कंपार्टमेंटमध्ये उच्च रोगजन्यता असलेल्या  एव्हियन इन्फ्लूएंझापासून मुक्तता  झाल्याची स्वयं घोषणा सादर केली आहे. 13 ऑक्टोबर 2023 रोजी, जागतिक अंडी दिनाच्या अनुषंगाने, WOAH ने ही स्वयं-घोषणा मंजूर केली. ही घोषणा आता WOAH वेबसाइटवर (https://www.woah.org/app/uploads/2023/10/2023-10-india-hpai-compartments-eng.pd) येथे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे.

भारतात महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये हे पोल्ट्री कंपार्टमेंट आहेत. जागतिक पशु आरोग्य संघटनेने दिलेली मान्यता आंतरराष्ट्रीय जैवसुरक्षा मानकांसाठी भारताची वचनबद्धता दर्शवते याबाबत उच्च दर्जा राखण्याची  भारताची  वचनबद्धता दर्शवते तसेच मांस आणि अंडी यासह भारतीय पोल्ट्री आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात क्षमता वाढविण्यात यामुळे अधिक योगदान मिळेल.जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा अंडी उत्पादक (129.60 अब्ज) आणि कुक्कुट मांसाचा (4.47 दशलक्ष टन) पाचवा सर्वात मोठा उत्पादक म्हणून, या यशाचा लाभ  घेण्यासाठी  भारत सज्ज आहे.

2022-23 आर्थिक वर्षात, भारताने 64 देशांना पोल्ट्री आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात केली, ज्यामुळे 134 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा महसूल प्राप्त झाला. या स्वयंघोषणेला मान्यता मिळाल्याने जागतिक बाजारपेठेत भारतीय पोल्ट्रीसाठी नवीन संधी खुल्या होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे देशाच्या आर्थिक वाढीला हातभार लागेल.

 

* * *

N.Joshi/B.Sontakke/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1967693) Visitor Counter : 128