अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोरोक्कोत माराकेच येथे G-20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर्सच्या चौथ्या आणि अंतिम बैठकीचा ठराव एकमताने मंजूर


बहुपक्षीय विकास बँकांच्या बळकटीकरणाबाबत G-20 स्वतंत्र तज्ञ गटाच्या अहवालाचे G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर्सच्या जाहीरनाम्याने केले स्वागत

क्रिप्टो मालमत्तेबाबतच्या G20 पथदर्शक आराखड्याला एफएमसीबीजी बैठकीत स्वीकृती

Posted On: 13 OCT 2023 5:20PM by PIB Mumbai

माराकेच, मोरोक्को/नवी दिल्‍ली, 13 ऑक्‍टोबर 2023

 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर, 12-13 ऑक्टोबर 2023 दरम्यान मोरोक्कोतील माराकेच इथे भारताच्या अध्यक्षतेखाली G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर (एफएमसीबीजी) यांची चौथी आणि अंतिम बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत, G-20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांनी G-20 वित्त मंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर्स यांचा ठराव एकमताने मंजूर केला.

एफएमसीबीजी ठराव हा, G-20 नवी दिल्ली नेतृत्व जाहीरनाम्याच्या (NDLD) च्या अनुषंगाने असून, त्याला या जाहीरनाम्याच्या वेळी मिळालेल्या सहमतीचा लक्षणीय फायदा झाला आहे.  

G-20 स्वतंत्र तज्ञ गटाने आपल्या अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे, बहुपक्षीय विकास बँकांच्या बळकटीकरणाला एफएमसीबीजी जाहीरनाम्याने अनुमोदन दिले आहे. एफएमसीबीजी ने, बहुपक्षीय विकास बँकांचा दृष्टीकोन, परिचालन मॉडेल्स आणि वित्तपुरवठा क्षमतांमध्ये परिवर्तनात्मक बदल करण्याची गरज लक्षात घेतली आहे.

खासगी भांडवल संघटित करून कामी लावणे, भांडवल वृद्धी व भांडवल पूर्तता आराखडा शिफारशींच्या अंमलबजावणीसह आपली आर्थिक क्षमता बळकट करणे आणि एक व्यवस्था म्हणून काम करण्याचे बहुउद्देशीय विकास बँकांना(एमडीबी)आवाहन जी 20 देशांच्या अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सनी(एफएमसीबीजी) केले आहे. अधिक चांगल्या, मोठ्या आणि अधिक कार्यक्षम एमडीबींसाठी अहवालातील शिफारशींवर निरंतर काम सुरू ठेवण्यास त्यांनी सांगितले आहे. 

क्रिप्टो मालमत्तेसंदर्भात जी 20 आराखडादेखील अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सनी स्वीकारला.  हा तपशीलवार आणि कृतीभिमुख आराखडा  जागतिक धोरणात  समन्वय साधण्यास तसेच उदयोन्मुख बाजार आणि विकसनशील अर्थव्यवस्था  यांवरील विशिष्ट परिणाम विचारात  घेऊन क्रिप्टो मालमत्तेसंदर्भात उपाययोजनात्मक/शामक रणनीती आणि नियमन  विकसित करण्यात मदत करेल. 

याव्यतिरिक्त जुलैमध्ये झालेली  जी 20 अर्थमंत्री  आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नसची बैठक आणि जी 20 नवी दिल्ली राष्ट्रप्रमुखांची शिखर बैठक यानंतर विविध जी 20 वित्तीय ट्रॅक कार्यप्रवाहातील विविध फलनिष्पत्तीचे प्रतिबिंब या जाहीरनाम्यात दिसून येते. 

या जाहीरनाम्यात, ब्राझीलच्या आगामी  जी 20 अध्यक्षतेचे स्वागत करण्यात आले आणि बळकट, शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक विकास  साध्य करण्यासाठी जागतिक आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी  काम सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 

जी 20 एफएमसीबीजी प्रसिद्धीपत्रक पुढील लिंकवर पाहता येईल. 

https://dea.gov.in/sites/default/files/Final%20G20%20FMCBG%20October%202023%20Communique.pdf 

किंवा 

इथे क्लिक करा

 

* * *

R.Aghor/Rajshree/Sonali K/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1967420) Visitor Counter : 116