संसदीय कामकाज मंत्रालय
नवव्या पी-20 शिखर परिषदेदरम्यान ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती आणि बांग्लादेशच्या संसदेच्या अध्यक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेतली भेट
जी 20 मध्ये आफ्रिकन महासंघाच्या समावेशाबद्दल ओम बिर्ला यांनी सकल आफ्रिकन संसदेच्या अध्यक्षांचे केले अभिनंदन
Posted On:
12 OCT 2023 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2023
लाईफ (LiFE)मिशनवरील संसदीय मंचाची बैठक आज 12 ऑक्टोबर 2023 रोजी, नवव्या G20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेच्या (P20) च्या भव्य उद्घाटनाच्या आदल्या दिवशी आयोजित करण्यात आली होती. भारताने आयोजित केलेली ही पहिली शिखर परिषद आहे. या बैठकीनंतर, ऑस्ट्रेलियाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे अध्यक्ष होन मिल्टन डिक; बांगलादेशच्या जातीय(राष्ट्रीय) संसदेच्या अध्यक्षा शिरीन शर्मीन चौधरी ; संयुक्त अरब अमिरातीच्या फेडरल नॅशनल कौन्सिलचे अध्यक्ष सक्र घोबाश आणि सकल आफ्रिकन संसदेचे कार्यवाहक अध्यक्ष डॉ. अशेबीर वोल्डेगॉर्जिस गायो यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.
जी-20 शिखर परिषदेदरम्यान, भारताचे प्राधान्यक्रम आणि उपक्रमांना संपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल, लोकसभा अध्यक्षांनी ऑस्ट्रेलियाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, आफ्रिकन महासंघाचा जी-20 मध्ये समावेश करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी, ऑस्ट्रेलियाची प्रशंसा केली. गेल्या काही काळात दोन्ही देशांच्या पंतप्रधानांचे दौरे आणि भेटीगाठीमुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधाना नवे आयाम मिळाले आहे, आणि दोन्ही देशातील परस्पर सहकार्य अधिक दृढ आणि ऊर्जामय झाले आहे. दोन्ही देशांतील संसदांमधील सहकार्याची व्याप्ती वाढवायला हवी, असे आवाहन बिर्ला यांनी केले.
बांग्लादेशाच्या जातीय संसदेच्या अध्यक्षा शिरीन शर्मिन चौधरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही, बिर्ला यांनी दोन्ही देशांतील संसदांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. रस्ते, रेल्वे, हवाई, जलमार्ग आणि डिजिटल क्षेत्राच्या माध्यमातून दोन्ही देशांतील संपर्क व्यवस्था वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
संयुक्त अरब अमिरातीच्या फेडरल नॅशनल कौन्सिलचे अध्यक्ष, सक्र घोबाश यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, ‘जागतिक जैव इंधन सहकार्य’ आणि भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर’ सारख्या उपक्रमांमुळे, भारत आणि यूएई एकमेकांच्या अधिक जवळ आले आहेत, असे ओम बिर्ला यांनी नमूद केले.
सकल आफ्रिकन संसदेचे कार्यवाहक अध्यक्ष डॉ. अशेबीर वोल्डेगॉर्जिस गायो, यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, बिर्ला यांनी G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि दोन्ही संसदांमधील पुढील सहकार्याच्या संधीविषयी चर्चा केली.
पी-20 शिखर परिषदेविषयी अधिक माहिती :
- जी-20 संसदीय अध्यक्ष शिखर परिषदेची नववी बैठक आणि संसदीय मंच.
- पंतप्रधान 13 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे नवव्या G20 संसदीय अध्यक्षीय शिखर परिषदेचे(P-20) उद्घाटन करणार आहेत.
- नवव्या P20 शिखर परिषदेसाठी G20 राष्ट्रांचे पीठासीन अधिकारी भारतात येण्यास सुरुवात झाली आहे.
- नवव्या P20 शिखर बैठकीपूर्वी मिशन LiFE वरील मंचाची बैठक.
- मिशन LiFE ने जगाला पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक नवीन व्यापक दृष्टीकोन दिला आहे: लोकसभा अध्यक्ष
#Parliament20 हॅशटॅग वापरून सोशल मीडियावरील संभाषणात सहभागी व्हा.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1967251)
Visitor Counter : 127