इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

ट्रॅफिक इन्फ्रा-टेक एक्स्पो आणि स्मार्ट मोबिलिटी परिषदेत वाहतूकविषयक समस्यांसाठी स्वदेशी पद्धतीने विकसित अत्याधुनिक वाहतूक यंत्रणांच्या सुविधेचा शुभारंभ

Posted On: 12 OCT 2023 7:40PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2023

औद्योगिक वापरासाठी सीएमओएस संवेदक आधारित कॅमेरा, अत्याधुनिक वाहतूक यंत्रणेसाठी उष्मा संवेदक कॅमेरा (टीवायआयटीएस) तसेच ऑनलाईन सुक्रो-क्रिस्टल इमेजिंग प्रणाली (ओएसआयएस) या स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानांची आज नवी दिल्ली येथील 11 व्या वाहतूक एक्स्पो आणि स्मार्ट मोबिलिटी परिषदेत सुरुवात करण्यात आली.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सचिव एस.कृष्णन यांनी मंत्रालयाच्या संशोधन आणि विकासविषयक गट समन्वयक सुनिता वर्मा तसेच ट्रॅफिकइन्फ्रा-टेक एक्स्पो च्या मुख्य संपादक मंगला चंद्रन यांच्यासह केंद्र सरकार तसेच उद्योग जगतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उत्पादनांचे उद्घाटन केले. मंत्रालयाच्या भारतीय शहरांसाठी इंटेलिजंट ट्रान्स्पोर्टेशन यंत्रणा नामक  प्रयासाच्या अंतर्गत या तंत्रज्ञानांचे विकसन करण्यात आले आहे.

तंत्रज्ञानांबाबत काही तपशील :

  1. औद्योगिक व्हिजन सुविधेसाठी सीएमओएस आधारित कॅमेरा: वस्तुंच्या स्वयंचलित तपासणी तसेच ओळख निश्चितीसाठीचे स्वदेशी तंत्रज्ञान. हा कॅमेरा मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग तंत्राच्या वापरातून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सुविधेला पाठबळ पुरवतो.
  2. उष्मा संवेदक आधारित कॅमेरा (टीवायआयटीएस): रस्त्यावरील वाहतुकीसाठी कृत्रिम तंत्रज्ञानाच्या वापरासह उष्मा संवेदक आधारित स्मार्ट व्हिजन कॅमेरा. हा कॅमेरा सर्व प्रकारच्या हवामानात, संपूर्णतः अंधाऱ्या वातावरणात देखील थांबलेल्या तसेच हलणाऱ्या प्रत्येक वस्तूची माहिती पुरवू शकतो. त्याच्या मोड्यूलर रचनेमुळे हा कॅमेरा चालवण्यास सोपा तसेच गरजेनुसार लेन्स बदलता येण्याजोगा आहे.
  3. ऑनलाईन सुक्रो स्फटिक इमेजिंग यंत्रणा (ओएसआयएस) : औद्योगिक कॅमेराचा वापर करून साखर उद्योगामध्ये साखरेच्या दाण्याचा आकार मोजण्यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. साखर उद्योगामध्ये आवश्यक असलेला हा अत्यंत महत्त्वाचा गुणवत्ताविषयक मापदंड आहे.

 

 

 

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1967189) Visitor Counter : 89