माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लॉन्च केला “क्रिश, ट्रिश अँड बालटीबॉय- भारत है हम” या ऍनिमेटेड मालिकेचा ट्रेलर


19 भाषांमध्ये रिलिज होणारी ही मालिका भाषांच्या सीमा ओलांडून जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल- अनुराग ठाकूर

या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच केंद्रीय संचार ब्युरो महसूल प्राप्त करेल- अपूर्व चंद्र

Posted On: 11 OCT 2023 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2023


केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्युरो आणि ग्राफिटी स्टुडियोची निर्मिती असलेली क्रिश, ट्रिश अँड बालटीबॉय ‘केटीबी- भारत है हम’ ही दोन सीझन असलेली ऍनिमेटेड मालिका लॉन्च केली. प्रत्येक 11 मिनिटे कालावधी असलेल्या 52 भागांची ही मालिका आहे. यामध्ये इ. स. 1500 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या कथांचा समावेश आहे. क्रिश, ट्रिश आणि बालटीबॉय या ऍनिमेटेड पात्रांचा यात समावेश आहे. ग्राफिटी स्टुडियोचे मुंजल श्रॉफ आणि तिलकराज शेट्टी या निर्माता जोडीने या मालिकेची निर्मिती केली आहे.    

    

ही मालिका म्हणजे स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या मात्र दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्तिमत्वांची, युवा वर्गाला ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे, असे यावेळी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. भूतकाळातील शिक्षण प्रणालीकडून या योगदानकर्त्यांना दुर्लक्षित केले होते आणि त्यांच्या कार्याची योग्य प्रकारे दखल घेण्यात आली नव्हती, असे ते म्हणाले.   

त्याबरोबरच आधुनिक भारताला ज्यांच्या प्रयत्नांमुळे आकार मिळाला त्यांच्या कहाण्या प्रकाशात आणून युवा पिढ्यांना प्रेरणा देण्याचा देखील प्रयत्न या मालिकेतून करण्यात येत आहे. परदेशी भाषांसह विविध भाषांमध्ये प्रदर्शित होत असलेली ही मालिका भाषांच्या सीमा ओलांडण्याचे आणि या नायकांच्या गाथा संपूर्ण जगात पोहोचवण्याचे काम करेल, असे त्यांनी नमूद केले.

दूरदर्शन, नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन प्राईम एकाच वेळी ही ऍनिमेटेड मालिका प्रदर्शित करतील, असा प्रयत्न यापूर्वी करण्यात आलेला नाही, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. या मालिकेमधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे महिला आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे परदेशी वसाहतवाद्यांविरोधातील संघर्षातील योगदान, असे त्यांनी सांगितले.

ही मालिका सर्व संसद सदस्यांना पुढील अधिवेशनात दाखवण्यात येईल, अशी घोषणा माहिती आणि प्रसारणमंत्र्यांनी केली.  

पंतप्रधानांच्या पंच प्रणांचा पुनरुच्चार करत त्यांनी लोकांना राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये आपल्या परीने योगदान देण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली होती, तर आजच्या युवा वर्गाला आपल्या देशाला अमृत काळातून सुवर्ण काळात नेण्यासाठी आपल्या प्रयत्नांनी योगदान द्यावेच लागेल, यावर त्यांनी भर दिला.  

माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा चंद्र म्हणाले की अशा प्रकारे सर्वसामान्यपणे भारतातील जनतेचा आणि  बालकांचा विशेषत्वाने विचार करून पहिल्यांदाच एक ऍनिमेटेड मालिका प्रदर्शित करण्यात येत असल्याने मंत्रालयासाठी देखील हा एक संस्मरणीय प्रसंग आहे. केंद्रीय संचार ब्युरो या व्यय विभाग असलेल्या विभागाने देखील पहिल्यांदाच महसूल प्राप्तीच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंजाळ श्रॉफ यांनी प्रेक्षकांना माहिती देताना सांगितले की एक हजारपेक्षा जास्त लोकांच्या सहभागाने तयार करण्यात आलेली ही मालिका म्हणजे एक महाप्रचंड प्रयत्न आहे. या निर्मितीमध्ये किती जास्त प्रमाणात काम करावे लागले आहे याविषयी सांगताना ते म्हणाले की एका सर्वसामान्य ऍनिमेशनपटामध्ये 25 ते 30 पात्रे आणि सुमारे 40 पार्श्वभूमींचा वापर असतो, मात्र, भारत है हम या मालिकेत सुमारे 50 ते 100 पात्रे आणि सरासरी 50 पार्श्वभूमींचा वापर करण्यात आला आहे.  

केटीबी-भारत हैं हम विषयी माहिती

आपल्या गौरवशाली स्वातंत्र्यलढ्याविषयी आणि आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या देशभरातील असंख्य वीरांविषयी भारतातील मुलांमध्ये जागृती करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला .

पूर्वीच्या सुप्रसिद्ध केटीबी  चित्रपट मालिकेतील लोकप्रिय पात्रे ‌क्रिश, ट्रिश आणि बाल्टीबॉय ही या मालिकेच्या प्रत्येक भागामध्ये असतील ;जी अशा नायकांच्या कहाण्या सादर करण्यासाठी संवाद सुरु करतील ज्या यापूर्वी आपण ऐकल्या नव्हत्या.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील विविधतेला सामावून घेणारी ही मालिका हिमाचल प्रदेश, बंगाल, पंजाब, केरळ आणि त्यापलीकडे असलेल्या विविध भागांतील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती देत विविध प्रदेशांचा प्रवास घडवतील. केंद्रीय संचार ब्युरो आणि ग्राफिटी स्टुडिओने निर्मित केलेली ही मालिका, धार्मिक अडथळे ओलांडून त्यापलीकडे‌ विश्वास  आणि ऐक्य पडद्यावर आणून देशाची  विश्वासाची भावना वृध्दिंगत करेल.

राणी अब्बक्का, तिलका मांझी, तिरोत सिंग, पीर अली, तात्या टोपे, कोतवाल धन सिंग, कुंवर सिंह(80 वर्षांचे स्वातंत्र्यसैनिक), राणी चेन्नम्मा, टिकेंद्र जीत सिंह आणि बरेच काही यांसारख्या असंख्य वीरांना या ॲनिमेटेड कलाकृती इतिहासात त्यांचे सुयोग्य स्थान मिळवून देतील.

मुंजाल श्रॉफ आणि तिलक शेट्टी या प्रतिभावंतांच्या कल्पनेतून साकार झालेल्या, या मालिकेच्या पहिल्या टप्प्यात मनोवेधक अशा प्रत्येकी 11   मिनिटांच्या ॲनिमेटेड एपिसोड्च्या कथा असलेल्या 26 भागांचा समावेश आहे

या मालिका खालील 12 भाषांमध्ये तयार केल्या जात आहेत:

हिंदी (मास्टर), तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, आसामी, ओडिया आणि इंग्रजी.

तसेच या मालिका पुढील आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये देखील डब केली जाईल:

फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, अरबी, चीनी, जपानी आणि कोरियन.

Channel

Season

Start Broadcast

End Broadcast

Doordarshan

Season 1

Sunday Oct 15, 2023

Sunday Jan 7, 2024

Season 2

Sunday Jan 28, 2024

Sunday Apr 21, 2024

या मालिकेचा आरंभ प्रथमच एकाचवेळी दोन सर्वात मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर-म्हणजे  Netflix आणि Amazon Prime Video वर होईल आणि ती जागतिक स्तरावर 12 भारतीय आणि 7 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये प्रदर्शित  केली जात; एका ऐतिहासिक प्रक्षेपणाच्या साक्षीदार होईल

Platform

Season

Launch Date

Territories

Netflix

Season 1

Sunday Oct 15, 2023

Worldwide

Season 2

Sunday Jan 28, 2024

Amazon
Prime Video

Season 1

Sunday Oct 15, 2023

Worldwide

Season 2

Sunday Jan 28, 2024

 

 N.Chitale/Shailesh P./Sampada/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1966662) Visitor Counter : 150