खाण मंत्रालय

खाण मंत्रालयाची तिसरी विशेष स्वच्छता मोहीम 3.0 यशस्वी


पहिल्याच आठवड्यात 95% पेक्षा जास्त सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यात आले

100% यश गाठण्यावर लक्ष केंद्रित करणार

Posted On: 10 OCT 2023 10:48AM by PIB Mumbai

 

खाण मंत्रालय आणि संलग्न संस्था तसेच सार्वजनिक सुरक्षा उत्कृष्टता केंद्र(CPSE)यांनी नियम/प्रक्रिया सुलभ करणे, नोंदीचे व्यवस्थापन, सार्वजनिक तक्रारी आणि त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणाचा अनुभव वाढवणे यासह प्रलंबित बाबींच्या निपटारा करण्यावर तिसऱ्या विशेष मोहीमेत (3.0) लक्ष्य निश्चित केले आहे.

या विशेष मोहीमेचा (3.0)आरंभ 2 ऑक्टोबर 2023 पासून असून खाण मंत्रालयाने अणु खनिज सवलत नियम, 2016 च्या दुरुस्तीद्वारे 27 नियमांना गुन्हेगारीमुक्त करून नियम/प्रक्रिया सुलभ करत 100% निर्धारित लक्ष्य गाठले आहे.

F74x5nPXMAAQugv

या तिसऱ्या विशेष मोहीमेच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयाने प्रलंबित सार्वजनिक तक्रारींपैकी 95.45% तक्रारींचे निराकरण केले आहे आणि अभिलेख व्यवस्थापनासाठी नियोजित केलेल्या कामांपैकी 52% कार्य पूर्ण केले आहे तसेच प्रत्यक्ष फायलींचा भार  कमी करण्यात 43% इतके लक्ष्य गाठले आहे, ज्यामुळे सुमारे 9212चौ.फूट कार्यालयीन क्षेत्र मोकळे झाले आहे.

आतापर्यंत देशभरात 344 पैकी 103 स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या आहेत आणि या मोहिमेच्या टप्प्यात 100% साध्य करण्यासाठी मंत्रालय कटिबद्ध आहे.

***

N.Meshram/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1966411) Visitor Counter : 87