संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची इटलीचे संरक्षण मंत्री गुईदो क्रोसेटा यांच्याशी रोम इथे द्विपक्षीय चर्चा; संरक्षण उद्योग सहकार्य क्षेत्रातील संधींवर चर्चा
संरक्षण क्षेत्रातील विविध बाबतीत सहकार्याला प्रोत्साहन देण्याबाबत दोन्ही देशांत करार, यात संरक्षण, संशोधन आणि विकास, सह विकास, सहनिर्मिती आणि संयुक्त उपक्रम स्थापन करण्याबाबत चर्चा
प्रविष्टि तिथि:
10 OCT 2023 10:05AM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या इटली आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर असून आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी काल रोम इथे इटलीचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली. यात प्रशिक्षण, माहितीचे आदान प्रदान, सागरी युद्ध सराव, आणि सागरी सुरक्षा अशा विषयांचा समावेश होता. त्यातही संरक्षण उद्योग सहकार्य क्षेत्रातील संधी यावर भर दिला जात असे.
यावेळी दोन्ही मंत्र्यांनी भारत आणि इटली, यांच्यात संरक्षण क्षेत्रातील परस्पर पूरक क्षमतांवर आणि संयुक्त विकासाच्या संधी यावरही चर्चा केली. भारतातील स्टार्ट अप्स आणि इटलीतील संरक्षण कंपन्या यांच्यात परस्पर संवादाला प्रोत्साहन दिले जावे, अशी सूचना राजनाथ सिंह यांनी यावेळी केली .
या बैठकीनंतर लगेचच संरक्षण क्षेत्रातील सहकार्य विषयक करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारामुळे, संरक्षण क्षेत्रातील विविध विषयांत द्विपक्षीय सहकार्याला पाठबळ मिळेल. जसे, की सुरक्षितता आणि संरक्षण धोरण, संशोधन आणि विकास, लष्करी क्षेत्रात शिक्षण, सागरी संरक्षण क्षेत्राविषयी शिक्षण, संरक्षण विषयक माहितीचे आदान प्रदान आणि औद्योगिक सहकार, ज्यात सहनिर्मिती, सह उत्पादन, आणि संयुक्त स्थापन करण्यावर चर्चा झाली.
याआधी, विला मादामा इथे राजनाथ सिंह यांचे गार्ड ऑफ ऑनर ने स्वागत करण्यात आले. सियांपिनो विमानतळावर संरक्षण मंत्र्यांचे स्वागत इटलीच्या राजदूत डॉ. नीना मल्होत्रा आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यानी केले.
**********
Jaydevi PS/Radhika A/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1966208)
आगंतुक पटल : 177