अर्थ मंत्रालय
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळामध्ये (सीबीआयसी) विशेष मोहीम 3.0 झपाट्याने सुरु
सर्व (सीबीआयसी) क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देशव्यापी स्वच्छता मोहीम सुरू
Posted On:
09 OCT 2023 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2023
महात्मा गांधींना ‘स्वच्छ भारत’ची मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्याच्या दृष्टीकोनातून, स्वच्छतेला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी आणि निश्चित केलेल्या प्रलंबित बाबींचा म्हणजेच विशेष महत्वाच्या व्यक्तींचे संदर्भ, सार्वजनिक तक्रारी, सार्वजनिक तक्रार अपील इ.प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी, 15 सप्टेंबर 2023 रोजी प्रलंबित बाबींच्या निपटारा करण्याच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या विशेष मोहीम (एससीडीपीएम ) 3.0 मध्ये केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मोठ्या जोमाने सहभागी झाले आहे.
या मोहीमेच्या अंतर्गत सीबीआयसीचा देशभरातील त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांसह, मोहिमेच्या 2 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान निश्चित केलेल्या संदर्भ/समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आहे.
मोहिमेदरम्यान 9 ऑक्टोबर 2023 पर्यंत 31 विशेष महत्वाच्या व्यक्तींचे संदर्भ, 933 सार्वजनिक तक्रारी, 357 सार्वजनिक तक्रार अपील निकाली काढण्यासाठी निश्चित आली आहेत. सीबीआयसीच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देशव्यापी स्वच्छता मोहिमेचे देखील नियोजन आहे. आजपर्यंत, मोहिमेदरम्यान स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी 1,038 ठिकाणे आधीच निश्चित करण्यात आली आहेत. सुमारे 44,000 प्रत्यक्ष फाईल्स आणि 23,000 ई-फाईल्स आढावा घेण्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. जुन्या/न वापरलेली कार्यालयीन उपकरणे आणि भंगार सामग्रीची विल्हेवाट लावणे यावरही या मोहिमेमध्ये भर दिला जात आहे यामुळे अतिरिक्त जागा मोकळी होणार असून निर्माण झालेल्या अतिरिक्त जागेचा वापर उपयुक्त कामासाठी केला जाईल.
एससीडीपीएम 3.0 पोर्टलद्वारे मोहिमेच्या टप्प्यात राबवलेल्या उपक्रमांची कामगिरी छायाचित्रांसह सामायिक केली जाईल. स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी आणि सार्वजनिक जागांच्या गुणवत्तापूर्ण वापरासाठी सीबीआयसी वचनबद्ध आहे.
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1966054)
Visitor Counter : 114