पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
07 OCT 2023 9:59PM by PIB Mumbai
हांगझोऊ इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पुरुष क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे .
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे ;
“आपल्या पुरुष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच सुवर्णपदक मिळवले. या ऐतिहासिक विजयाबद्दल आमच्या अतुलनीय क्रिकेटपटूंचे हार्दिक अभिनंदन. त्यांची खेळाबद्दलची जिद्द आणि संघभावना यामुळे पुन्हा एकदा देशाचा गौरव झाला आहे. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”
****
MI/Radhika/CY
Follow us on social media:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai