माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताची सलग तिसऱ्यांदा आशिया -पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या (AIBD) अध्यक्षपदी निवड

Posted On: 06 OCT 2023 2:36PM by PIB Mumbai

 

भारताने आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी 2018 पासून घेतली असून, 2018 ते 21. 2021 ते 23 अशी दोन वेळा सलग भारताकडे ही जबाबदारी आहे. आणि आता सलग तिसऱ्यांदा या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्षपदी भारताची निवड होणे, ही एक अभूतपूर्व घटना आहे.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देतांना, माहिती आणि प्रसारण सचिवांनी सांगितले की अशी घटना एआयबीडी संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. 50 वर्षे जुन्या असलेल्या ह्या संस्थेने पुन्हा भारताची अध्यक्षपदी निवड करणे, म्हणजे आशिया-प्रशांत क्षेत्र आणि संपूर्ण जगानेच भारतावर दाखवलेला हा विश्वास आहे.  भारत या क्षेत्रात जगाला मार्ग दाखवू शकतो आणि प्रसारण क्षेत्राला एक नवे मूल्य मिळवून देऊ शकतो.

एआयबीडी या संस्थेची स्थापना यूनेस्कोच्या अंतर्गत, 1977 साली झाली असून ही एक विशेष प्रादेशिक आंतरसरकारी संस्था आहे. सध्या या संस्थेचे 44 देशांतील 92 सदस्य आहेत. ज्यात, 26 सरकारी सदस्य (देश) प्रतिनिधी असून ते 48 प्रसारण प्राधिकरणे आणि प्रसारण संस्थांचे प्रतिनिधित्व करतात. तसेच 44 संलग्न संस्था 28 देशांचे आणि आशिया, प्रशांत क्षेत्र, युरोप, आफ्रिका, अरब देश आणि उत्तर अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतात. भारत या संस्थेचा एक संस्थापक सदस्य असून, भारताची  सार्वजनिक प्रसारण सेवा, प्रसार भारती, या संस्थेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करते.

आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थे (AIBD) ची 21 वी सर्वसाधारण परिषद आणि संबंधित सभा, 2023 (GC 2023) अध्यक्ष, आणि प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गौरव द्विवेदी, यांच्या अध्यक्षतेखाली 2 ते 4 ऑक्टोबर, 2023 दरम्यान मॉरिशसच्या पोर्तुसिटी इथे झाली. धोरण निर्मिती आणि संसाधन विकासाद्वारे आशिया-पॅसिफिक प्रदेशात एक गतिमान आणि एकसंध इलेक्ट्रॉनिक मीडिया साठी पोषक वातावरण निर्मितीविषयी या परिषदेत महत्वाची चर्चा झाली. 

आंतरराष्ट्रीय प्रसारण संस्थेत असे प्रतिष्ठित पद भूषवण्याची सलग तिसऱ्यांदा मिळालेली संधीकेवळ भारत आणि प्रसार भारतीवरील आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दृढ विश्वासच दर्शवत नाही तर प्रसारणाच्या क्षेत्रात धोरणात्मकदृष्ट्या पुढील टप्पे गाठण्यासाठी भारताचा पायाही त्यातून घातला जात आहे.

***

S.Bedekar/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1965010) Visitor Counter : 156