गृह मंत्रालय
(i) अंदमान आणि निकोबार बेटे भाडेकरार नियमन, 2023 (ii) दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव भाडेकरार नियमन, 2023 (iii) लक्षद्वीप भाडेकरार नियमन, 2023 ची घोषणा
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2023 4:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारतीय राज्यघटनेच्या कलम 240 अंतर्गत (i) अंदमान आणि निकोबार बेट भाडेकरार नियमन, 2023 (ii) दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव भाडेकरार नियमन, 2023 (iii) लक्षद्वीप भाडेकरार नियमन 2023 जारी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
अंदमान आणि निकोबार बेटे भाडेकरार नियमन, 2023; दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव भाडेकरार नियमन, 2023 आणि लक्षद्वीप भाडेकरार नियमन, 2023 अंदमान आणि निकोबार बेटे , दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये घरमालक आणि भाडेकरू या दोघांचे हितसंबंध आणि हक्क संतुलित करून घर भाडेतत्वावर देण्यासाठी जबाबदार आणि पारदर्शक परिसंस्था निर्माण करण्यासाठी कायदेशीर चौकट प्रदान करेल.
हे नियम भाडेविषयक बाजारपेठेतील खाजगी गुंतवणूक आणि नवउद्योजकतेला चालना देतील. तसेच स्थलांतरित, औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रातील कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी इत्यादींसह समाजातील विविध उत्पन्न घटकांसाठी पुरेसा भाडे तत्वावरील गृहनिर्माण साठा तयार करतील. हे नियम दर्जेदार भाडेतत्वावरील निवासस्थानांची उपलब्धता वाढविण्यात देखील मदत करतील; आणि भाडेतत्वावर घरे उपलब्ध करून देण्याच्या व्यापाराचे हळूहळू औपचारिकीकरण होईल, ज्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटे, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक उत्साही, शाश्वत आणि समावेशक भाडेतत्वावर घरे उपलब्ध करून देण्याची बाजारपेठ तयार होईल.
Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1964175)
आगंतुक पटल : 213