संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय आणि बांगलादेशच्या सैन्यांचा संयुक्त सराव सुरू

Posted On: 03 OCT 2023 8:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023

भारत आणि बांगलादेश यांचा 11वा  वार्षिक संयुक्त लष्करी सराव, संप्रितीला 03 ऑक्टोबर 2023 रोजी मेघालयातील उमरोई येथे प्रारंभ झाला. दोन्ही देश आळीपाळीने आयोजित करत असलेला हा युद्ध सराव मजबूत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य पुढाकार दर्शवतो.2009 साली आसाम मधील जोरहाट येथे सुरू झालेल्या या युद्ध सराव मालिकेच्या 2022 पर्यंत दहा यशस्वी आवृत्त्या पार पडल्या आहेत.

संप्रिती -XI या 14 दिवस चालणाऱ्या सरावात दोन्ही देशांचे सुमारे 350 जवान  सहभागी होतील.हा सराव दोन्ही सैन्यांमधील आंतरकार्यक्षमता वाढवणे, आणि सर्वोत्तम पद्धतींना चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.

बांगलादेशच्या तुकडीतील सुमारे 170 जवान 52 बांगलादेश पायदळ ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर जनरल मोहम्मद मफिझुल इस्लाम रशीद यांच्या नेतृत्वाखाली या सरावात सहभागी होत  आहेत. तर भारतीय तुकडीचे नेतृत्व माउंटन ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर एस के आनंद यांच्याकडे आहे. या सरावात दोन्ही देशांचे तोफखान्यातील जवान, अभियंते तसेच इतर सहाय्यक शस्त्रे आणि सेवांसारख्या विविध विभागातील कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत.

या सरावात सहभागींना ‘आत्मनिर्भर भारत’ उपकरण प्रदर्शनही पाहता येणार आहे. 

संप्रिती -XI मुळे  भारत आणि बांगलादेश यांच्यातील संरक्षण सहकार्य आणखी वृद्धिंगत होणार असून  द्विपक्षीय संबंध अधिक  दृढ,तसेच  सांस्कृतिक जाण अधिक सखोल होणार आहे.

 

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1963823) Visitor Counter : 267


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu