रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू असलेले “ट्रेन्स ऍट ए ग्लान्स (TAG)” नावाचे अखिल भारतीय रेल्वे वेळापत्रक केले प्रसिद्ध
भारतीय रेल्वेच्या www.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक उपलब्ध
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2023 6:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023
रेल्वे मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू असलेले “ट्रेन्स ऍट ए ग्लान्स (TAG)” नावाचे अखिल भारतीय रेल्वे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,1,304,366,537,2960 या ठिकाणी देखील हे नवे वेळापत्रक उपलब्ध आहे.

या नव्या वेळापत्रकाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :
- 64 वंदे भारत रेल्वेगाड्या आणि इतर 70 रेल्वेगाड्यांचा समावेश
- सध्या सुरू असलेल्या 90 सेवांचा इतर स्थानकांपर्यंत विस्तार
- 12 सेवांच्या वारंवारतेत वाढ
- 22 रेल्वेगाड्यांच्या वेगात वाढ करून त्यांचे सुपरफास्ट श्रेणीत रुपांतर
- 20501/02 आगरतळा-आनंद विहार राजधानी गाडी आता मालदा, भागलपूरमार्गे
- रेल्वेगाड्यांच्या नियमिततेत सुधारणा करण्यासाठी दक्षिण पूर्व रेल्वेच्या काही सेवांच्या वेळापत्रकात बदल
प्रवाशांना आरामदायी आणि कार्यक्षम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी नव्या वेळापत्रकात वंदे भारत रेल्वेगाड्यांच्या 64 सेवा आणि इतर रेल्वेगाड्यांच्या 70 सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
विविध शहरांमधील कनेक्टिव्हिटीत वाढ करण्यासाठी आणि प्रवासाच्या वेळेत कपात करण्यासाठी नवे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार रेल्वेगाड्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळा तपासून घेण्याची प्रवाशांना सूचना करण्यात येत आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1963777)
आगंतुक पटल : 231