पंतप्रधान कार्यालय
तेलंगण मधल्या मेहबूबनगर इथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
01 OCT 2023 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2023
तेलंगणच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजन जी, केंद्र सरकार मधले माझे सहयोगी मंत्री, जी. किशन रेड्डी जी,संसदेतले माझे सहकारी संजय कुमार बंडी जी, इथे उपस्थित इतर मान्यवर उपस्थित महिला आणि पुरुष वर्ग,
नमस्कार!
देशात सण-उत्सवांचा काळ सुरु झाला आहे. संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक संमत करून नवरात्रीपूर्वीच आम्ही शक्ती पूजनाची भावना स्थापित केली आहे. आज तेलंगणामधल्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे, यामुळे उत्सवाला अधिकच रंग चढला आहे. 13 हजार 500 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांसाठी तेलंगणाच्या जनतेचे खूप-खूप अभिनंदन करतो.
ना कुटुम्भ सभ्युल्लारा।
मला आनंद आहे की आज मी अशा अनेक रस्ते जोडणी प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले आहे ज्यामुळे इथल्या जनतेच्या जीवनात मोठे परिवर्तन घडणार आहे. नागपूर-विजयवाडा मार्गीकेमुळे तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधली ये-जा अधिक सुलभ होणार आहे. यामुळे या तिन्ही राज्यांमधल्या व्यापार,पर्यटन आणि उद्योग क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे.या मार्गिकेच्या काही महत्वाच्या आर्थिक केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून यामध्ये आठ विशेष आर्थिक क्षेत्रे, पाच मेगा फूड पार्क, चार फिशिंग सीफूड क्लस्टर, 3 फार्मा आणि मेडिकल क्लस्टर आणि 1 टेक्सटाइल क्लस्टरचा समावेश असल्यामुळे हनमकोंडा, वारंगल, महबूबाबाद आणि खम्मम जिल्ह्यातल्या युवकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी खुल्या होणार आहेत. अन्न प्रक्रियेमुळे या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पिकांचेही मूल्य वर्धन साध्य होणार आहे.
ना कुटुम्भ सभ्युल्लारा।
पाईपलाईनची पायाभरणी झाली आहे. यामुळे तेलंगणाच्या विविध जिल्ह्यांमध्ये हजारो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होणार आहे.
ना कुटुम्भ सभ्युल्लारा।
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या विविध भवनांचे उद्घाटन मी आज केले. भाजपा सरकारने हैदराबाद विद्यापीठाला नामवंत संस्थेचा दर्जा दिला आहे आणि विशेष निधीही उपलब्ध करून दिला आहे. पुरवठा देखील केला आहे. आपणा सर्वांसमोर मी आज मोठी घोषणा करत आहे. भाग रत सरकार मुलुगु जिल्ह्यामध्ये केंद्रीय आदिवासी विद्यापीठाची स्थापना करणार आहे. पूज्यनीय आदिवासी देवियां सम्मक्का-सारक्का असे या विद्यापीठाचे नामकरण करण्यात येईल. सम्मक्का-सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठावर 900 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाबद्दल तेलंगणातल्या नागरिकांचे मी अभिनंदन करतो. तेलंगणातल्या नागरिकांच्या स्नेह आणि आपुलकीबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो.हा सरकारी कार्यक्रम असल्याने मी स्वतःला इतकेच मर्यादित ठेवले आहे. 10 मिनिटानंतर मोकळ्या मैदानात जाईन तेव्हा जरा अधिक मोकळेपणाने बोलेन आणि मी आश्वासन देतो, जे बोलेन त्या तेलंगणाच्या मनातल्या, इथल्या लोकांच्या मनातल्याच गोष्टी बोलेन.
खूप-खूप धन्यवाद!
* * *
NM/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1963270)
Visitor Counter : 75
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam