कृषी मंत्रालय
कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागामधील 300 लोक उद्या, सकाळी 10 वाजता एसएफएसी कार्यालयात “एक तारीख, एक घंटा, एक साथ” उपक्रमांतर्गत ‘ भव्य स्वच्छता मोहिमे’मध्ये होणार सहभागी
कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग
Posted On:
30 SEP 2023 1:25PM by PIB Mumbai
"एक तारीख, एक घंटा, एक साथ" उपक्रमाचा एक भाग म्हणून, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे 300 हून अधिक कर्मचारी हौज खास येथील छोटे शेतकरी कृषी व्यवसाय संघ इमारतीत स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत.
"एक तारीख, एक घंटा, एक साथ" हा यावर्षीच्या 'स्वच्छता हीच सेवा' (SHS) मोहिमेतील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. हा उपक्रम देशभरातील नागरिकांना 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता, स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यासाठी प्रेरित करतो. .
'स्वच्छता हीच सेवा' (SHS) मोहीम 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राबविला जात आहे. स्वयंसेवी सहभाग आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या मूळ उद्देशाने देशाच्या बहुसंख्य भागात राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेची मुख्य संकल्पना 'कचरामुक्त भारत,' स्वयंसेवीतेची भावना किंवा 'श्रमदान' ही असेल. हे कार्यक्रम नागरिकांसाठी सोयीचे असावेत आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांना सहभागी होता यावे यासाठी संस्था, शाळा, बाजारपेठा आणि उद्याने यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी या राष्ट्रव्यापी उपक्रमांचे धोरणात्मक नियोजन केले जाते आहे.
हा उपक्रम म्हणजे बापूंना (महात्मा गांधी) त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सामूहिक 'स्वच्छांजली' (श्रद्धांजली) असे संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 'वेळ काढून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले', लोक त्यांच्या गल्लीत, किंवा शेजारच्या उद्यानात, नदी, तलाव किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी 'या स्वच्छतेत सामील होऊ शकतात', असेही ते म्हणाले.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने, त्यांच्या अधीन विविध कार्यालयांसह, 1 ऑक्टोबर रोजी देशभरात 250 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी सक्रीय पुढाकार घेतला आहे, या उपक्रमात 7,000 हून अधिक नागरिक या 'जन आंदोलन' चळवळीत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय, कृषी भवनाचा परिसर नवीन कुंडीत लावलेल्या वनस्पतींनी सुशोभित केला जाणार आहे.
शिवाय, 2 ऑक्टोबर रोजी, स्वच्छता हीच सेवा मोहिमेचा एक भाग म्हणून कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागामधील कर्मचार्यांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. तरुण सहभागींमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पसरविण्यात ही स्पर्धा मदत करेल. याव्यतिरिक्त, कर्मचार्यांसाठी आयोजित रॅली मोहिमेची प्रसिद्धी वाढवेल आणि सामान्य लोकांमध्ये त्यांच्या स्वच्छतेबाबतच्या जबाबदारीची जागरूकता वाढवेल.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1962391)
Visitor Counter : 110