खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जुलै 2023 मध्ये खनिज उत्पादनात 10.7% वाढ


पंधरा महत्त्वाच्या खनिजांचे उत्पादन वाढले

प्रविष्टि तिथि: 28 SEP 2023 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2023

 

2023 वर्षात (आधार वर्ष: 2011-12=100) जुलै महिन्याचा खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक 111.9 वर पोहोचला असून जुलै 2022 च्या तुलनेत हे प्रमाण 10.7% जास्त आहे. भारतीय खाण ब्युरोच्या (आयबीएम) तात्पुरत्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै या कालावधीतील वाढ मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 7.3% इतकी आहे.

जुलै 2023 मध्ये महत्त्वाच्या खनिजांचा उत्पादन उत्पादन स्तर पुढीलप्रमाणे होता :  कोळसा 693 लाख टन, लिग्नाइट 32 लाख टन, नैसर्गिक वायू (उपयुक्त ) 3062 दशलक्ष घन मीटर, पेट्रोलियम (कच्चे ) 25 लाख टन, बॉक्साइट 1477 हजार टन, क्रोमाईट 280 हजार टन, तांबे घन 10 हजार टन, सोने 102 किलो, लोह धातू 172 लाख टन, शिसे घन 30 हजार टन, मॅगनीज धातू  217 हजार टन, जस्त घन 132 हजार टन, चुनखडी 346 लाख टन, फॉस्फराईट 120 हजार टन आणि मॅग्नेसाइट 10 हजार टन.

जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 दरम्यान सकारात्मक वाढ दर्शविणारी महत्त्वाची खनिजे पुढीलप्रमाणे आहेत : क्रोमाईट (45.9%), मॅंगनीज धातू  (41.7%), कोळसा (14.9%), चुनखडी (12.7%), लोह धातू  (11.2%), सोने (9.7%), तांबे घन  (9%), नैसर्गिक वायू (उपयुक्त 8.9%), शिसे घन (4.7%), जस्त घन (3.6%), मॅग्नेसाइट (3.4%) आणि पेट्रोलियम (कच्चे ) (2.1%). नकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या इतर महत्त्वाच्या खनिजांमध्ये पुढील खनिजांचा समाविष्ट आहेत : लिग्नाइट (-0.7%), बॉक्साइट (-3.2%), फॉस्फराइट   (-24.7%) आणि हिरे  (-27.3%).

 

* * *

M.Pange/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1961677) आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Tamil , Telugu , English , Urdu , हिन्दी