संरक्षण मंत्रालय
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी कारवार येथील नौदल तळ आणि आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेला दिली भेट
महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि इतर धोरणात्मक उपक्रमांच्या प्रगतीचा घेतला आढावा
Posted On:
24 SEP 2023 6:02PM by PIB Mumbai
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी कारवार इथल्या नौदल तळाला आणि आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेला 23 सप्टेंबर 2023 रोजी भेट दिली. या नौदल तळावरच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा, निवासी व्यवस्था आणि इतर धोरणात्मक उपक्रमांच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.
सी डी एस नी कारवारच्या नौदल तळावरील आणि सी बर्ड प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सुरक्षिततेबाबतच्या नव्याने पुढे येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता राखणारा तसेच भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सुसज्जता सुनिश्चित करणारा या दृष्टीने तळाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1960193)