ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत (घरगुती) 13 ई-लिलावात 18.09 लाख मेट्रिक टन गव्हाची केन्द्राने केली विक्री

Posted On: 22 SEP 2023 3:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2023

गहू आणि पीठाच्या किरकोळ किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने  केन्द्र सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) खुल्या बाजार विक्री योजने (स्थानिक) अंतर्गत साप्ताहिक ई-लिलावाद्वारे गव्हाची विक्री करत आहे. गव्हाच्या सध्याच्या हमीभावाच्या दराने म्हणजेच 2125/- प्रति क्विंटल या राखीव दराने केन्द्राने गहू उपलब्ध केला आहे.

देशभरातील 480 हून अधिक गोदामातून  प्रत्येक साप्ताहिक लिलावात 2.00 लाख मेट्रिक टन गहू उपलब्ध केला जात आहे. 2023-24 या वर्षात 21.09.2023 पर्यंत एकूण 13 ई-लिलाव झाले आहेत. यात 18.09 लाख मेट्रिक टन गव्हाची या योजने अंतर्गत विक्री झाली आहे.

ऑगस्ट 23 मध्ये गव्हाची सरासरी विक्री किंमत 2254.71 रुपये प्रति क्विंटल होती.   20.09.23 च्या ई-लिलावात ती कमी होऊन 2163.47 रुपये प्रति क्विंटल झाली. खुल्या बाजारात गव्हाचे बाजारभाव थंडावल्याचे गव्हाच्या सरासरी विक्री किमतीतील घसरणीचा कल सूचित करतो.  प्रत्येक साप्ताहिक ई-लिलावात, उपलब्ध केलेल्या गव्हाच्या तुलनेत विक्रीचे प्रमाण 90% च्या पुढे नाही. देशभरात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे याचेच हे निदर्शक आहे.

ओएमएसएस (डी) धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे खुल्या बाजारात गव्हाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या गेल्या आहेत. 2023-24 च्या उर्वरित कालावधीसाठी ओएमएसएस (डी) धोरण चालू ठेवण्यासाठी केंद्रीय गोदामात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.   

N.Meshram/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959649) Visitor Counter : 113


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu