माहिती आणि प्रसारण मंत्रालय

दहशतवादासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींना व्यासपीठ प्रदान करु नका: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांना सूचना

Posted On: 21 SEP 2023 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2023

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज दूरचित्रवाणी वाहिन्यांनासाठी एक सूचनापपत्र जारी केले आहे. या सूचनापत्राद्वारे मंत्रालयाने, ज्या व्यक्तींवर दहशतवादासह इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत किंवा कायद्याने प्रतिबंधित असलेल्या संघटनांशी ज्यांचा संबंध आहेत अशा व्यक्तींना कोणतेही व्यासपीठ देणे टाळावे,असे सांगण्यात आले आहे.

परदेशातील एका व्यक्तीच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर नुकत्याच झालेल्या चर्चेतील सहभागाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला जारी करण्यात आला आहे. ही व्यक्ती भारतात कायद्याने प्रतिबंधित केलेल्या संघटनेशी संबंधित असून तिच्या विरोधात दहशतवादासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. या चर्चेदरम्यान त्या व्यक्तीने देशाचे सार्वभौमत्व/अखंडता, भारताची सुरक्षा, परदेशांबरोबर भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याची क्षमता असलेल्या अनेक आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या होत्या.

सरकार प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याचे समर्थन करते आणि घटनेनुसार त्यांच्या अधिकारांचा आदर देखील करते, परंतु त्याच वेळी दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे आशय प्रसारित करताना केबल दूरचित्रवाणी नेटवर्क्स (रेग्युलेशन) कायदा, 1995 मधील कलम 20 च्या उपकलम (2) या तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सूचनेचे तपशील खालील लिंकवर उपलब्ध आहेत.

 

https://new.broadcastseva.gov.in/digigov-portal-web-app/Upload?flag=iframeAttachView&attachId=140712323&whatsnew=true

 

 

R.Aghor/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959518) Visitor Counter : 154