श्रम आणि रोजगार मंत्रालय
शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक दर निर्देशांक - ऑगस्ट, 2023
Posted On:
21 SEP 2023 10:09AM by PIB Mumbai
शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक दर निर्देशांकाचा आकडा, (आधारभूत वर्ष: 1986-87=100) ऑगस्ट, 2023 मध्ये अनुक्रमे 9 आणि 8 अंकांनी वधारला आहे आणि तो अनुक्रमे 1224 (एक हजार दोनशे चोवीस) आणि 1234 (एक हजार दोनशे चौतीस) इतका झाला आहे. शेतमजूर आणि ग्रामीण मजूर यांच्या सामान्य निर्देशांकात अनुक्रमे 8.38 आणि 7.69 अंक इतकी वाढ होण्यामागे, प्रामुख्याने तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळी, दूध, बकऱ्याचे मांस, साखर, गुळ, मिरची-वाळवलेली, हळद, लसूण, आले, कांदा, मिश्र मसाले इ. अन्नधान्य उत्पादनाच्या किमतीत झालेल्या वाढीचे प्रमुख योगदान आहे.
निर्देशांकातील वाढ राज्यनिहाय बदलत असून, कृषी मजुरांच्या बाबतीत, 20 राज्यांमध्ये 2 ते 19 अंकांची वाढ नोंदवली गेली. तमिळनाडू राज्य 1423 अंकांसह निर्देशांकात अव्वल असून, सर्वात शेवटी 942 अंकासह हिमाचल प्रदेश हे राज्य आहे.
ग्रामीण मजुरांच्या बाबतीत, 20 राज्यांमध्ये 2 ते 18 गुणांची वाढ नोंदवली गेली. 1412 गुणांसह तामिळनाडू राज्य निर्देशांकात अव्वल तर हिमाचल प्रदेश 1003 गुणांसह सर्वात तळाशी आहे.
राज्यांमध्ये, कृषी मजुरांसाठीच्या ग्राहक दर निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेघालयमध्ये (19 अंक) आणि ग्रामीण मजुरांसाठी गुजरात आणि मेघालयमध्ये (प्रत्येकी 18 अंक) झाली. ही वाढ प्रामुख्याने तांदूळ,डाळी,बीफ शेंगदाणा तेल , मिरची-हिरवी/वाळवलेली, सरपण, बस भाडे इत्यादींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे होती.
शेतमजुरांसाठीचा ग्राहक दर निर्देशांक (CPI-AL) आणि ग्रामीण मजुरांसाठीचा ग्राहक दर निर्देशांक (CPI-RL) यावर आधारित महागाईचा दर ऑगस्ट, 2023 मध्ये अनुक्रमे 7.37% आणि 7.12% इतका होता. जुलै 2023 मध्ये तो अनुक्रमे 7.43% आणि 7.26% इतका, तर मागील वर्षीच्या याच महिन्यात तो अनुक्रमे 6.94% & 7.26% इतका होता. त्याचप्रमाणे ऑगस्ट 2023 मध्ये अन्नधान्यावर आधारित महागाईचा दर अनुक्रमे 8.89% आणि 8.64% होता. जुलै 2023 मध्ये तो 8.88% आणि 8.63%, आणि गेल्या वर्षीच्या याच महिन्यात तो अनुक्रमे 6.16% आणि 6.21% इतका होता.
अखिल भारतीय ग्राहक दर निर्देशांकाची आकडेवारी (सामान्य आणि गट निहाय):
गट
|
शेतमजूर
|
ग्रामीण मजूर
|
|
जुलै, 2023
|
ऑगस्ट, 2023
|
जुलै, 2023
|
ऑगस्ट, 2023
|
सामान्य निर्देशांक
|
1215
|
1224
|
1226
|
1234
|
खाद्यान्न
|
1152
|
1164
|
1158
|
1170
|
पान, सुपारी, इ.
|
1992
|
1994
|
2002
|
2004
|
इंधन आणि वीज
|
1304
|
1303
|
1295
|
1295
|
वस्त्र, अंथरुण-पांघरुण आणि पादत्राणे
|
1258
|
1253
|
1302
|
1300
|
संकीर्ण
|
1266
|
1272
|
1271
|
1276
|
सप्टेंबर 2023 साठी शेतमजूर (CPI – AL) आणि ग्रामीण मजुरांसाठीचा(RL) दर निर्देशांक आणि 20 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर होईल.
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959322)
Visitor Counter : 150