मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, परषोत्तम रुपाला यांनी आज नवी दिल्ली येथे मत्स्यव्यवसाय विभागाच्या वार्षिक क्षमता निर्माण योजनेचा (ACBP) केला शुभारंभ
Posted On:
20 SEP 2023 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2023
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, परषोत्तम रुपाला यांनी आज नवी दिल्ली येथे मत्स्यव्यवसाय विभागाच्या वार्षिक क्षमता निर्माण योजनेचा (ACBP) शुभारंभ केला. राज्यमंत्री, डॉ. एल. मुरुगन, सीबीसी सदस्य प्रशासक प्रवीण परदेशी, सचिव, डॉ. अभिलाक्ष लेखी, सहसचिव, सागर मेहरा आणि मत्स्यव्यवसाय विभाग, सीबीसी आणि गुजरात राज्याचे इतर वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
मंत्रालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढीच्या गरजा ओळखणे आणि विभागाच्या प्राधान्यक्रमांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या क्षमता वाढीसाठी कृती आराखडा विकसित करणे ही काळाची गरज आहे यावर परषोत्तम रुपाला यांनी आपल्या भाषणात भर दिला. क्षमता वाढीच्या दृष्टीने सेवा वितरण, कार्यक्रम अंमलबजावणी आणि मुख्य सरकारी कार्ये पार पाडण्यात मत्स्यव्यवसाय विभागाची वार्षिक क्षमता निर्माण योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असे ते म्हणाले.
मत्स्य व्यवसाय क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने या योजनेचे महत्त्व राज्यमंत्री, डॉ. एल. मुरुगन यांनी अधोरेखित केले. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील तांत्रिक नवोन्मेष ही काळाची गरज आहे अशा अनेक मत्स्यपालन संस्था भारतात आहेत. भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या वाढीसाठी ACBP महत्त्वपूर्ण ठरेल असे मुरुगन यांनी नमूद केले.
‘एसीबीपी’ कार्यान्वित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी विभागामध्ये क्षमता निर्माण युनिट (सीबीयू) अधिसूचित करण्यात आले आहे. येथे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने प्रशिक्षण उपलब्ध असेल. क्षमता निर्माण आयोगाने कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्था आणि ज्ञान भागीदारांची निवड केली आहे. ACBP ची परिणामकारकता तपासण्यासाठी विभाग आपल्या कर्मचार्यांवरील प्रशिक्षणाच्या प्रभावाचे मूल्यांकन करेल.
* * *
S.Bedekar/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959122)
Visitor Counter : 152