श्रम आणि रोजगार मंत्रालय
जुलै 2023 मध्ये 19.88 लाख नवीन कर्मचारी राज्य विमा योजनेशी (ईएसआय) गेले जोडले
नवीन नोंदणीमध्ये 25 वर्षे वयोगटातील 9.40 लाख तरुण कर्मचाऱ्यांचा समावेश
जुलै 2023 मध्ये सुमारे 27,870 नवीन आस्थापनांची ईएसआय योजनेंतर्गत झाली नोंदणी
जुलै 2023 मध्ये 52 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांना ईएसआय योजनेचा देण्यात आला लाभ
Posted On:
20 SEP 2023 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2023
कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट अहवालामधून असे आढळून आले आहे की, जुलै 2023 मध्ये 19.88 नवीन कर्मचारी महामंडळाशी जोडले गेले आहेत.
जुलै 2023 मध्ये सुमारे 27,870 नवीन आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांना कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे, त्यामुळे सुरक्षा कवचाची व्याप्ती वाढली आहे.
आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येते की देशात तरुणांसाठी अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. कारण जुलै 2023 मध्ये महामंडळाशी जोडल्या गेलेल्या एकूण 19.88 लाख कर्मचार्यांपैकी 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील 9.54 लाख कर्मचाऱ्यांची नवीन नोंदणी आहे. ही संख्या एकूण कर्मचार्यांच्या 47.9 % आहे.
वेतनपट अहवालाचे लिंगनिहाय विश्लेषण दर्शवते की जुलै 2023 मध्ये महिला सदस्यांची एकूण नोंदणी 3.82 लाख इतकी होती. जुलै 2023 मध्ये एकूण 52 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनीही कर्मचारी राज्य विमा योजने (ईएसआय )अंतर्गत नोंदणी केल्याचे आकडेवारी दर्शविते. यावरून असे दिसून येते की, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आपला लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहे.
आकडेवारी निर्मिती ही अखंड प्रक्रिया असल्यामुळे, वेतनपट अहवाल तात्पुरता आहे.
* * *
S.Bedekar/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959033)
Visitor Counter : 134