कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीभूत लोक तक्रार निवारण आणि नियमन प्रणालीतील राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचा 13 वा, ऑगस्ट 2023 साठीचा अहवाल प्रशासकीय सुधारणा व जन त क्रार विभागाने केला जाहीर


महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशाने ऑगस्ट 2023 मध्ये केला सर्वाधिक तक्रारींचा निपटारा

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी ऑगस्ट 2023 मध्ये एकूण 82,013 तक्रारींचे केले निवारण. शिल्लक राहिल्या 1,69,753 तक्रारी

उत्तर प्रदेश सरकारचा सर्वाधिक तक्रारी दाखल झालेल्या राज्यांमध्ये तक्रार निवारणात पहिला क्रमांक, त्या पाठोपाठ झारखंड आणि राजस्थान

20,000 पेक्षा कमी तक्रारींच्या निवारणाच्या क्रमवारीत तेलंगण सरकार सर्वोच्च क्रमाकांवर, त्या पाठोपाठ छत्तीसगढ आणि केरळ

ईशान्येकडील राज्यांमध्ये सिक्कीम सरकारचा सर्वोच्च क्रमांक, त्या पाठोपाठ असम आणि अरुणाचल प्रदेश

केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षद्वीप सर्वोच्च क्रमांकावर, त्या पाठोपाठ अंदमान निकोबार आणि लदाख

Posted On: 19 SEP 2023 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2023

 

प्रशासकीय सुधारणा आणि जन तक्रार विभागा- (डीएआरपीजी) ने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या केंद्रीभूत लोक तक्रार निवारण आणि नियमन प्रणाली (सीपीजीआरएएमएस) -तील ऑगस्ट 2023 महिन्यातील कामगिरीचा 13 वा मासिक अहवाल जाहीर केला. जनतेच्या तक्रारी व त्यांचे निवारण कशा प्रकारे झाले याविषयीचे सविस्तर विश्लेषण या अहवालात आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी एकूण 82,013 तक्रारींचे निवारण केले. त्यामुळे, सीपीजीआरएएमएस पोर्टलवर आलेल्या एकूण तक्रारींपैकी आता 1,69,753 तक्रारी शिल्लक राहिल्या आहेत.

जुलै 2023 अखेरीस शिल्लक तक्रारींची संख्या 1,79,077 होती, ती आता 1,69,753 वर आली आहे. ही संख्या या वर्षातील आजवरच्या शिल्लक तक्रारींची सर्वात कमी संख्या आहे. सलग 12 व्या महिन्यात, मासिक तक्रार निवारणाच्या संख्येने 50,000 चा आकडा ओलांडला आहे.

मे 2023 पासून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना सीपीजीआरएएमएस पोर्टलवरील कामगिरी पाहून क्रमवारी देण्यास डीएआरपीजीने सुरुवात केली. ईशान्येकडील राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि तक्रारींच्या संख्येवर आधारित अन्य दोन गट अशा चार गटांमध्ये ही क्रमवारी दिली जाते. तक्रार निवारण व नियमनासाठी केंद्र सरकारने या क्रमवारीची सुरुवात केली असून त्यामध्ये दर्जा आणि निवारणासाठी लागलेला या दोन बाबी व अन्य चार निकष लावले जातात.

01.01.2023 ते 31.08.2023 या कालावधीतील पहिल्या तीन क्रमांक पुढीलप्रमाणे:

अनुक्रम

गट

राज्ये/केंद्रशासित प्रदेश

क्रमांक 1

क्रमांक 2

क्रमांक 3

1

गट A

ईशान्येकडील राज्ये

सिक्कीम

असम

अरुणाचल प्रदेश

2

गट B

केंद्रशासित प्रदेश

लक्षद्वीप

अंदमान-निकोबार

लदाख

3

गट C

>= 20000 तक्रारी आलेली राज्ये

उत्तर प्रदेश

झारखंड

राजस्थान

4

गट D

< 20000 तक्रारी आलेली राज्ये

तेलंगण

छत्तीसगढ

केरळ

उत्तर प्रदेशात यंदा ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 24575 तक्रारी दाखल झाल्या. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने अनुक्रमे 24157 व 18692 तक्रारींचा ऑगस्ट मध्ये निपटारा केला. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये या संदर्भात सुरू असलेल्या प्रशिक्षणाच्या थेट व नेमक्या वेळेत (रीअल-टाईम) नियमनासाठी डीएआरपीजीने सर्वोत्तम योजनेमध्ये पोर्टल विकसित केले आहे.

 

* * *

S.Tupe/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959031) Visitor Counter : 97