गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आज लोकसभेत ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी मानले आभार


भारताच्या शाश्वत संस्कृतीनुसार देशाच्या लोकशाहीमध्ये “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:” हे तत्व आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले अंमलात

देशातील महिलांना त्यांचे हक्क खर्‍या अर्थाने मिळवून देण्यासाठी 'नारी शक्ती वंदन विधेयक' लोकसभेत मांडण्याचा घेतला निर्णय

‘महिला सक्षमीकरण’ ही मोदी सरकारची केवळ घोषणा नसून एक संकल्प असल्यचे पंतप्रधानांनी दाखवून दिले; करोडो देशवासियांच्या वतीने या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन : अमित शहा

"धोरण असो की नेतृत्व, भारताच्या महिला शक्तीने हे सिद्ध केले आहे की, त्या कोणत्याही क्षेत्रात कोणापेक्षाही कमी नाहीत’’

महिला शक्तीच्या पाठिंब्याशिवाय आणि ताकदीशिवाय सशक्त आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती शक्य नाही, यावर मोदी सरकारचा विश्‍वास

"देशातील महिलांना त्यांचे योग्य हक्क मिळवून देण्यासाठी मोदी सरकारचा हा निर्णय आगामी काळात विकसित आणि समृद्ध भारताच्या उभारणीचा मुख्य आधारस्तंभ ठरेल’’

Posted On: 19 SEP 2023 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2023

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री,  अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील  केंद्र सरकारने आज लोकसभेत ‘नारीशक्ती वंदन विधेयक’  सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. एक्स या समाज मध्‍यमावर एका  पोस्टमध्‍ये अमित शहा यांनी म्हटले  आहे  की, आज पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी भारताच्या शाश्वत संस्कृतीनुसार देशाच्या लोकशाहीमध्ये “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:” हे तत्त्व लागू केले आहे. ते म्हणाले की, देशातील महिलांना त्यांचे हक्क खर्‍या अर्थाने मिळवून देण्यासाठी 'नारी शक्ती वंदन विधेयक'  लोकसभेत मांडण्याचा  निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. मंत्री अमित  शाह पुढे  म्हणाले की, मोदी यांनी दाखवून दिले आहे की,  'महिला सक्षमीकरण' ही मोदी सरकारची केवळ घोषणा नसून एक संकल्प आहे.  करोडो देशवासीयांच्या वतीने मी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, धोरण असो किंवा नेतृत्व, भारताच्या महिला शक्तीने हे सिद्ध केले आहे की,  त्या कोणत्याही क्षेत्रात त्या कोणापेक्षाही  कमी नाहीत. महिला शक्तीच्या पाठिंब्याशिवाय आणि ताकदीशिवाय सशक्त आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती शक्य नाही, असा मोदी सरकारचा विश्वास आहे. देशातील महिलांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी मोदी सरकारचा हा निर्णय आगामी काळात विकसित आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी  मुख्य आधारस्तंभ ठरेल, असेही गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

 

 

* * *

S.Patil/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1958922) Visitor Counter : 83