गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
या सप्ताहाच्या शेवटी तरुणाईने निवडली स्वच्छता !
4000 हून अधिक शहर संघ भारतीय स्वच्छता लीगच्या दुसऱ्या आवृत्तीत झाले सामील
Posted On:
19 SEP 2023 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2023
भारतीय स्वच्छता लीग (ISL) च्या 2 ऱ्या आवृत्तीत 4000 हून अधिक शहरांनी भाग घेऊन स्वच्छ भारत मिशन- शहरी भाग ला नवीन चालना दिली. भारतीय स्वच्छता लीग (ISL) हा युवकांच्या नेतृत्वाखालील, स्वच्छतेशी संबंधित उपक्रमांमध्ये तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठीचा शहरांतर्गत उपक्रम आहे. भारतीय स्वच्छता लीग (ISL) चा भाग म्हणून, शहरातील संघ स्वच्छतेचे विजेते म्हणून समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे आणि टेकड्या उत्साहाने स्वच्छ करत आहेत. स्वच्छ भारत मिशन- शहरी भाग (SBM-U) अंतर्गत 2022 मध्ये भारतीय स्वच्छता लीग (ISL) ची उद्घाटन आवृत्ती एक भव्य यशस्वी उपक्रम ठरली, कारण सुमारे पन्नास हजार स्वयंसेवक शहरांना कचरामुक्त करण्यासाठी या उपक्रमात सहभागी झाले.
स्वच्छता पंधरवडा - स्वच्छता हीच सेवा 2023 चे आयोजन 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे - जो दिवस महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. भारतीय स्वच्छता लीग (ISL), सफाईमित्र सुरक्षा शिबिर आणि स्वच्छता दिवस या मोहीमा स्वच्छता पंधरवड्या अंतर्गत राबविण्यात येत आहेत.
या शहरांनी भारतीय स्वच्छता लीग 2.0 साठी मनोरंजक अशी शहर संघांची नावे निवडली आहेत. निवडलेल्या संघाचे कर्णधार आणि सदिच्छादूत प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, प्लॉगमन रिपुदमन बेवली, टेबलटेनिसपटू स्वस्तिका घोष, गतविजेते चंडीगढ चॅलेंजर्स संघातील रामवीर तन्वर, हुन्सूर हीरोज, विकमासिंगपुरम, दांडेली स्वच्छता वॉरियर्स, कुश्तगी चॅम्पियन्स आणि अर्सिकेरे आर्मीचा नोंदणी करणाऱ्या पहिल्या संघांपैकी समावेश होता.
शहरांनी विविध प्रभावी स्वच्छता उपक्रम राबविले आणि सुंदर भित्तीचित्रे बसवली, त्याचबरोबर मानवी साखळी तयार करून आयएसएल 2.0(ISL 2.0) आणि स्वच्छता जनआंदोलनाच्या (लोकचळवळीच्या) संकल्पनेवर आधारित विविध प्रकारच्या रचना तयार केल्या. भोपाळमध्ये, एकेकाळी कचराकुंडी असलेल्या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. या बदललेल्या आणि स्वच्छ वातावरणात योग दिनाचे स्मरण करण्यासाठी नागरिक प्रतिनिधी, एनसीसी छात्र, स्काउट आणि गाईड आणि इतर अनेक जण एकत्र आले होते.
कर्नाटकातील दावणगेरे येथे भारताचा नकाशा तयार करण्यासाठी सुमारे 4,000 मुलांनी भाग घेतला, गतविजेत्या टीम चंदीगड चॅलेंजर्सने 10,000 लोकांना जेवण देण्यासाठी एसयुपी (SUP) मोफत महा लंगरचे आयोजन केले होते, तर अलेप्पीमध्ये स्वच्छतेसाठी 'सेव्ह द लेक'(तलाव वाचवा) नावाने जलयात्रा काढण्यात आली होती.
विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी या उत्साहात सहभागी होऊन नागरिकांना स्वच्छता जनआंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रमा अंतर्गत 5 सफाईमित्रांचा सत्कार केला तसेच आयएसएल 2.0(ISL 2.0) च्या टी-शर्ट आणि टोप्यांचे वाटपही केले. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी मणिपूरमध्ये स्वच्छता ही सेवा मोहिमेचे उद्घाटन केले आणि प्रत्येक नागरिकाला स्वच्छ भारतासाठी योगदान देण्यास सांगितले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 10, 5 आणि 2 किलोमीटर अंतराच्या 'स्वच्छता लीग मॅरेथॉन' ला हिरवा झेंडा दाखवून भारतीय स्वच्छता लीगची सुरुवात केली.
* * *
S.Patil/Shraddha/Vikas/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958817)
Visitor Counter : 171