अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2023-24 साठीच्या (16.09.2023 पर्यंत) सकल प्रत्यक्ष कर संकलनात 18.29% वाढ


आर्थिक वर्ष 2023-24 साठीच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात (16.09.2023 रोजी) 23.51% पेक्षा जास्त वाढ

आर्थिक वर्ष 2023-24 साठीचे अग्रीम कर संकलन (16.09.2023 रोजी) 20.73% वाढीसह 3,55,481 कोटी रुपये

16.09.2023 पर्यंत 1,21,944 कोटी रुपयांचा परतावा केला जारी

Posted On: 18 SEP 2023 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 सप्‍टेंबर 2023

 

आर्थिक वर्ष 2023-24 (16.09.2023 पर्यंत) साठीचे प्रत्यक्ष कर संकलनाचे तात्पुरते आकडे समोर आले असून निव्वळ संकलन 8,65,117 कोटी रुपये इतके झाले आहे. जे मागील आर्थिक वर्षाच्या (आर्थिक वर्ष 2022-23) या कालावधीत 7,00,416 कोटी इतके होते. त्यात 23.51% ची वाढ दिसून येत आहे.

निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन (16.09.2023 रोजी) 8,65,117 कोटी रुपये इतके असून यात कॉर्पोरेशन  कर (CIT) 4,16,217 कोटी रुपये (निव्वळ परतावा) आणि रोखे व्यवहार करासह (STT) वैयक्तिक प्राप्तीकर संकलन (PTI) 4,47,291 कोटी रुपये (निव्वळ परतावा) यांचा समावेश आहे.

2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष करांच्या एकूण संकलनाची तात्पुरती आकडेवारी (परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) 9,87,061 कोटी रुपये इतकी आहे. जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 8,34,469 कोटी रुपये होती. मागील तुलनेत यात 18.29% ची वाढ दिसून येत आहे.

सकल कर संकलन 9,87,061 कोटी रुपये इतके असून यात कॉर्पोरेशन  कर  (CIT) 4,71,692 कोटी रुपये आणि रोखे व्यवहार करासह (STT) वैयक्तिक प्राप्तीकर संकलन (PTI) 5,13,724 कोटी रुपये यांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 साठीचे (16.09.2023 रोजी) अग्रीम  कर संकलनाचे तात्पुरते आकडे समोर आले असून तो 3,55,481 कोटी रुपये इतका आहे.  मागील  आर्थिक वर्ष 2022-23 च्या संबंधित कालावधीत आगाऊ कर संकलन 2,94,433 कोटी रुपये इतके होते त्यात यंदा 20.73% ची वाढ दिसून येत आहे. 16.09.2023 पर्यंत अग्रीम  कर संकलन 3,55,481 कोटी रुपये इतके झाले असून यात कॉर्पोरेशन  कर(CIT) 2,80,620 कोटी रुपये आणि वैयक्तिक प्राप्ती कर (PIT) 74,858 कोटी रुपये यांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 16.09.2023 पर्यंत 1,21,944 कोटी रुपये परतावा जारी करण्यात आला आहे. 

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1958610) Visitor Counter : 179