विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर-एनएमएल आणि केएएमपी: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग याबाबत ज्ञान आदानप्रदान सत्र


सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या ज्ञान आघाडी आणि नॉलेज एंड अवेयरनेस मैपिंग प्लेटफॉर्म (केएएमपी) या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या 800 विद्यार्थ्यांनी या सत्रामध्ये घेतला भाग

Posted On: 16 SEP 2023 10:36AM by PIB Mumbai

 

सीएसआयआरच्या (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) जमशेदपूरमधल्या राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळेतील (एनएमएल) वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सुमन तिवारी यांनी  सीएसआईआर-नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन एंड पॉलिसी रिसर्च (एनआईएससीपीआर- राष्ट्रीय विज्ञान संवाद आणि धोरण संशोधन संस्था) आणि मे. एनसीपीएल यांचा पुढाकार आणि ज्ञान आघाडी व नॉलेज एंड अवेयरनेस मैपिंग प्लेटफॉर्म (केएएमपी) अंतर्गत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या 800 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आदानप्रदान सत्राचे आयोजन केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) ही दोन क्षेत्रे एकमेकांशी खूप संबंधित क्षेत्रे असून अलिकडच्या वर्षांत त्यांचे महत्त्व आणि अनुप्रयोग लक्षणीयरीत्या वाढले असल्याचे डॉ. तिवारी यांनी स्पष्ट केले.  ही क्षेत्रे  मोठी तांत्रिक प्रगती करत आहेत आणि आपल्या जीवनातील विविध पैलूंना आकार देत आहेत. या विशेष सीएसआयआर -एनएमएल आणि केएएमपीच्या कार्यशाळेत आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या क्षेत्रांविषयी जाणून  घेऊ, एआय व एमएलच्या रहस्यांचा शोध घेऊ आणि या प्रभावी तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊ जे आपल्या कामाच्या, जगण्याच्या आणि नवनवीन पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणत आहेत."

सीएसआयआर- राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळा (सीएसआयआर -एनएमएल) ही खनिजे, धातू आणि साहित्य- विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक सेवा आणि मनुष्यबळ विकासाच्या विविध पैलूंसाठी समर्पित एक प्रमुख भारतीय संशोधन संस्था आहे. मटेरिअल्स इंजिनिअरिंग, धातू उत्खनन आणि पुनर्वापर, खनिज प्रक्रिया, प्रगत सामग्री  आणि प्रक्रिया, विश्लेषणात्मक आणि उपयोजित रसायनशास्त्र इ. ही सीएसआयआर -एनएमएलजमशेदपूर येथील प्रमुख संशोधन क्षेत्रे आहेत.

केएएमपी, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर ) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च आणि औद्योगिक भागीदार मे. न्यासा कम्युनिकेशन्स प्रा. लि (एनसीपीएल) यांचा एक पुढाकार आणि ज्ञान आघाडी आहे.  विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्षमतांना वाव मिळावा यासाठी सर्जनशीलता, अर्थपूर्ण शिक्षण, वाचन आणि विचार कौशल्ये विकसित करणे, हा यामागचा हेतू आहे.

***

S.Pophale/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1957946) Visitor Counter : 95


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu