वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताचे नेतृत्व राष्ट्राला जागतिक अर्थव्यवस्थेसमवेत एकीकृत करण्यासाठी कटीबद्ध असून यामध्ये नवीकरणीय उर्जेची मध्यवर्ती भूमिका : पीयूष गोयल
Posted On:
15 SEP 2023 5:32PM by PIB Mumbai
भारताचे नेतृत्व राष्ट्राला जागतिक अर्थव्यवस्थेसमवेत एकीकृत करण्यासाठी कटीबद्ध असून यामध्ये नवीकरणीय उर्जेची मध्यवर्ती भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले. 'एमएनआरई –सीआयआय’च्या चौथ्या स्वच्छ ऊर्जा आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन या कार्यक्रमामध्ये ते आज नवी दिल्ली येथे बोलत होते. ‘जागतिक पुरवठा-साखळीतील लवचिकता साध्य करण्यासाठी भारताला भागीदार म्हणून स्थापित करणे ' या विषयावरील सत्रात मुख्य भाषण देताना, मंत्री पीयूष गोयल यांनी, स्वच्छ, शाश्वत, परवडणारे, आणि सर्वसमावेशक ऊर्जा संक्रमण, परिणामांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला. याविषयी जी- 20 नवी दिल्ली घोषणापत्रामध्ये नमूद केले असल्याचे त्यांनी सांगितले.
‘भारत, मध्य- पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर, हरित हायड्रोजन आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्प यासारख्या उपक्रमांद्वारे भौगोलिक सीमेपलिकडे जाऊन जगाला जवळ आणण्यासाठी जागतिक नेतृत्व करण्यासाठी भारताची वचनबद्धता व्यक्त केली. भारत केवळ जागतिक पुरवठा साखळीत सहभागी होऊ पाहत नाही, तर जगाला अधिक शाश्वत, सर्वसमावेशक आणि एकमेकांशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ इच्छित आहे यावर त्यांनी भर दिला.
अक्षय ऊर्जा प्रकल्प राबवून जास्तीत जास्त जागतिक बाजारपेठा काबीज करण्यावर भर देण्याचे आवाहन, मंत्री गोयल यांनी उपस्थितांना केले.
भारताकडे अभियांत्रिकी कौशल्य आणि जगभरातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये सक्रियतेने सहभागी होण्याची क्षमता आहे. भारताला अक्षय ऊर्जा क्षेत्रात जागतिक नेता बनण्याची संधी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. तसेच मोठ्या कंपन्यांना जागतिक ऊर्जा संक्रमण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतर देशांशी सहयोग आणि भागीदारी करण्याचे आवाहन केले.
***
N. Chitale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1957893)
Visitor Counter : 128