माहिती आणि प्रसारण मंत्रालय
54 व्या इफ्फीसाठी नोंदणी सुरू,सिनेरसिकांकरता पर्वणी
Posted On:
13 SEP 2023 6:23PM by PIB Mumbai
पणजी, 13 सप्टेंबर 2023
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) प्रतिनिधी नोंदणीला प्रारंभ झाला असून देशातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाची उलटगणना सुरू झाली आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. हा वार्षिक चित्रपट महोत्सव,भारतातील आणि जगभरातील चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांना एकाच छताखाली आणतो, तसेच तरुण प्रतिभेला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपुढे कला सादर करण्यासाठी व्यासपीठ देखील प्रदान करतो. अशा प्रकारे कला, चित्रपट,संस्कृतीच्या एकसंध ऊर्जेचा उत्सव साजरा करतो.
भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मर्यादित (एनएफडीसी) तसेच केन्द्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गोवा राज्य सरकारच्या गोवा एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (इएसजी) आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेमे दाखवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
इफ्फी, विविध विभागांमध्ये वैविध्यपूर्ण भारतीय आणि जागतिक सिनेमांची निवड करते. आंतरराष्ट्रीय स्पर्धा (15 निवडक दर्जेदार सिनेमांची निवड), आयसीएफटी- गांधी पदक पुरस्कारासाठी स्पर्धा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण चित्रपट स्पर्धा, सर्वोत्तम जागितक सिनेमा (इफ्फीने जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपटातून केलेली अधिकृत निवड), इंडियन पॅनोरमा (विविध भारतीय भाषांमधील सिनेमॅटिक, संकल्पनाधारित आणि सौंदर्यविषयक उत्कृष्टतेचा वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आणि गैर-चित्रपटांचा संग्रह), महोत्सव कॅलिडोस्कोप ((दिग्गजांचे असमान्य चित्रपट, उद्योन्मुख प्रतिभांचे काम, इतर महोत्सवातील समीक्षकांनी नावाजलेले चित्रपट) अशा काही विभागांचा यात समावेश आहे.कंट्री फोकस,अॅनिमेशन, माहितीपट आणि गोवन चित्रपट यांसारख्या भारतीय आणि परदेशी चित्रपटांचे विशेष तयार केलेले पॅकेज देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. महोत्सवातील प्रीमियर्स, दैनंदिन रेड कार्पेट कार्यक्रम आणि समारंभ या महोत्सवातून मिळणारी अनुभूती वाढवणारे आहेत.
चित्रपट प्रदर्शित करण्याव्यतिरिक्त, इफ्फी कार्यशाळा, मास्टरक्लास म्हणजेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन , परस्परसंवाद सत्रे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायातील 200 हून अधिक मान्यवर व्यक्तींचे परिसंवाद यात आहेत.
54 व्या इफ्फीसाठी प्रतिनिधी नोंदणी खालील श्रेणींसाठी iffigoa.org द्वारे केली जाऊ शकते:
चित्रपट प्रेमी प्रतिनिधी : रु. 1000/- + जीएसटी
व्यावसायिक प्रतिनिधी : रु. 1000/- + जीएसटी
विद्यार्थी प्रतिनिधी : नोंदणी शुल्क नाही
54 व्या इफ्फीच्या बरोबरीने भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे आयोजित केलेल्या 17 व्या फिल्म बझारसाठी देखील नोंदणी सुरू झाली आहे.फिल्म बाजार दक्षिण आशियातील सर्वात मोठी जागतिक चित्रपट बाजारपेठ म्हणून काम करतो , दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, विक्री एजंट आणि महोत्सव सूचनापटकार यांच्यात सर्जनशील आणि आर्थिक सहयोग निर्माण करणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देते. फिल्म बाजारासाठी प्रतिनिधी नोंदणी filmbazaarindia.com वर उपलब्ध आहे.
54 व्या इफ्फीसाठी प्रसारमाध्यमांसाठीची नोंदणी लवकरच सुरू होईल, याद्वारे पत्रकारांना आणि माध्यम व्यावसायिकांना या सिनेमॅटिक कार्यक्रमात प्रवेश मिळणार आहे.
S.Patil/Vinayak/Sonal C/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1957098)
Visitor Counter : 244