राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय ई-विधान एप्लिकेशनचे’ उद्‌घाटन


राष्ट्रपतींनी गुजरात विधानसभेला केले संबोधित

Posted On: 13 SEP 2023 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2023

गुजरातमधील गांधीनगर येथे आज (13 सप्टेंबर, 2023) रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘राष्ट्रीय ई-विधान ऍप्लिकेशन ’चे (एनईव्हीए) उद्घाटन केले आणि त्यांनी  गुजरात विधानसभेला संबोधित केले.

1960 मध्ये गुजरात राज्याच्या स्थापनेपासून, गुजरात विधानसभेने नेहमीच समाजाच्या हितासाठी काम केले आहे, असे राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना सांगितले. गुजरात विधानसभेने वेळोवेळी अनेक स्तुत्य पावले उचलली आहेत, असे त्या म्हणाल्या. आज झालेले ई-विधानचे उद्घाटन हे एक महत्त्वाचे पाऊल असून हे या सभागृहाचे डिजिटल सभागृहात रूपांतर करेल. राष्ट्रीय ई-विधान अॅप्लिकेशनच्या (एनईव्हीए) माध्यमातून या सभागृहातील सदस्य हे संसद आणि देशातील इतर विधानसभांच्या सर्वोत्तम पद्धती शिकू शकतात आणि त्याचा अवलंब करू शकतात , असे त्यांनी सांगितले. "एक राष्ट्र एक एप्लिकेशन" या ध्येयाने प्रेरित असलेला हा उपक्रम, गुजरात विधानसभेच्या कामकाजात अधिक गती आणि पारदर्शकता आणेल आणि सभागृहाची संपूर्ण प्रक्रिया कागदविरहित राहिल्याने पर्यावरणाचेही रक्षण होईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

जी 20 शिखर परिषदेदरम्यान जागतिक जैवइंधन आघाडीच्या स्थापनेचा संदर्भ देत राष्ट्रपती म्हणाल्या की, पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीनंतर भारताच्या नेतृत्वाखाली उचललेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी तंत्रज्ञान हे महत्त्वाचे साधन असून ई-विधान आमदारांना लोकांशी जोडलेले राहण्यास मदत करेल, असे राष्ट्रपती म्हणाल्या. संसदीय शिष्टाचार आणि प्रतिष्ठा राखून आमदार या सभागृहात लोककल्याणासाठी चर्चा करण्याचा नवा मापदंड प्रस्थापित करतील, अशी इच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी  कृपया येथे क्लिक करा.

 

 

S.Tupe/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1956944) Visitor Counter : 191