पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची कोरियाच्या अध्यक्षांसोबत बैठक
Posted On:
10 SEP 2023 7:53PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरियन प्रजासत्ताकाचे अध्यक्ष यून सुक येऊल यांची नवी दिल्ली येथे जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. यून सुक येऊल यांनी भारताच्या जी 20 अध्यक्षतेबद्दल तसेच चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला यावर्षी 50 वर्षे पूर्ण झाल्याची नोंद दोन्ही नेत्यांनी घेतली. त्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण उत्पादन, सेमीकंडक्टर आणि ईव्ही बॅटरी तंत्रज्ञान यांच्यासह विशेष द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीच्या विविध क्षेत्रांमधील प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली.
***
VC/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1956191)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam