पंतप्रधान कार्यालय

युरोपिय परिषदेचे अध्यक्ष आणि युरोपिय आयोगाच्या अध्यक्ष यांच्या सोबत झाली पंतप्रधानांची बैठक

Posted On: 10 SEP 2023 7:58PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीयुरोपिय परिषदेचे अध्यक्ष माननीय  चार्ल्स मिशेल आणि युरोपिय आयोगाच्या अध्यक्ष माननीय श्रीमती उर्सुला वॉन डर लेयन यांच्या सोबत आज 10 सप्टेंबर 2023 रोजी बैठक झाली.

दोन्ही अतिथींनी भारताने जी-20 अध्यक्षीय कारकिर्दीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले.

आगामी भारत - युरोपीय महासंघ शिखर परिषद, सध्या सुरू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी, हवामान बदल, LiFE , डिजिटल तंत्रज्ञान आणि व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद (टी टी सी) यासह भारत युरोप महासंघ धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंवर या बैठकांमध्ये भर देण्यात आला.

9 सप्टेंबर 2023 रोजी जी-20 परिषदे दरम्यान घोषित झालेल्या, भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक पट्ट्यावरहीनेत्यांनी चर्चा केली. या आर्थिक पट्ट्याची वेगाने अंमलबजावणी व्हावी असा मनोदय या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. या आर्थिक पट्ट्या अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याच्या शक्यतेवर सुद्धा पंतप्रधान यांनी या बैठकीत प्रकाशझोत टाकला. 

***

Jaydevi PS/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1956176) Visitor Counter : 149