संरक्षण मंत्रालय

तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे झालेल्या आशियाई तटरक्षक संस्था प्रमुखांच्या 19 व्या बैठकीत भारतीय तटरक्षक दलाचा सहभाग

Posted On: 10 SEP 2023 6:54PM by PIB Mumbai

 

भारतीय तटरक्षक दलाने, 5 ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे झालेल्या आशियाई तटरक्षक संस्था प्रमुखांच्या 19 व्या बैठकीत (एचएसीजीएएम) भाग घेतला. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक डीजी राकेश पाल यांच्या नेतृत्वाखालील दलाच्या चार सदस्यीय पथक तटरक्षक संस्थांचे 23 सदस्य आणि आरईसीएएपी तसेच युएनओडीसी यांच्या स्वरूपातील 2 सदस्य यांनी बनलेल्या स्वतंत्र मंचाच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहिले.

सर्व सदस्य देशांच्या तटरक्षक दलांचे प्रमुख सहभागी झालेल्या या तीन दिवसीय उच्च-स्तरीय बैठकीमध्ये सागरी कायद्याची अंमलबजावणी, सागरातील मानवी जीवनाची सुरक्षा आणि संरक्षण, सागरी पर्यावरण संरक्षण, अंमली पदार्थांची अवैध तस्करी, शस्त्रास्त्रे आणि सागरातील माणसांची कार्ये इत्यादी मुद्द्यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांच्या शृंखलेवर विचारविनिमय करण्यात आला. तसेच यावेळी, कार्यक्रम निश्चित करून पुढील सहकार्याच्या मार्गांवर देखील चर्चा करण्यात आली. आशियाई तटरक्षक दलांमधील सागरी सहकार्य आणखी वाढवण्याचा निश्चय या मंचाने व्यक्त केला.

हा मंच म्हणजे भारतीय तटरक्षक दलाने  नोव्हेंबर 1999 मध्ये समुद्री चाचांचे एमव्ही अलोंड्रा रेनबो हे जहाज ताब्यात घेण्याची कारवाई केल्यानंतर, क्षेत्रीय तटरक्षक दलांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी जपानने सुरु केलेल्या उपक्रमाची पुढची पायरी आहे.

या क्षेत्रात निर्धोक, सुरक्षित आणि स्वच्छ सागरी वातावरणाची सुनिश्चिती करून त्यास प्रोत्साहन देण्यासाठी सदस्य आशियाई देशांच्या  तटरक्षक दलांच्या दरम्यान सहकार्य अधिक वाढवण्यावर या एचएसीजीएएम मध्ये प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. सामायिक सागरी समस्यांवर समन्वित प्रतिसाद तसेच समन्वय साधण्याच्या दिशेने केंद्रित आणि लक्ष्याधारित दृष्टीकोन स्वीकारणे शक्य करण्यासाठी या मंचामध्ये चार कृतिगटांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक दलाकडे या मंचातील शोध आणि बचाव (एसएआर) कृतीगटाचे अध्यक्षपद असून भारतीय तटरक्षक दल हे पर्यावरण संरक्षण सागरातील बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध तसेच माहितीचे सामायीकीकरण यांच्याशी संबंधित इतर कृतिगटाचा देखील सक्रीय सदस्य आहे. एचएसीजीएएमची याआधीची बैठक 2022 मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती.

***

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1956112) Visitor Counter : 107