पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी घेणार तीन द्विपक्षीय बैठका- मॉरिशसचे पंतप्रधान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत या तीन बैठकांमध्ये होणार चर्चा
प्रविष्टि तिथि:
08 SEP 2023 1:40PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीटर संदेशात माहिती दिली आहे की ते आज संध्याकाळी नवी दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी तीन द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. यामध्ये मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याबरोबरच्या बैठकीचा समावेश असेल.
या बैठकींमुळे भारताच्या या देशांबरोबरच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची आणि विकासात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:
“आज संध्याकाळी माझ्या निवासस्थानी होणाऱ्या तीन द्विपक्षीय बैठकींसाठी मी उत्सुक आहे. मी मॉरिशसचे पंतप्रधान @कुमार जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि @POTUS @JoeBiden यांना भेटणार आहे. या बैठकांमुळे भारताच्या या देशांबरोबरच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची आणि विकासात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल.”
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1955569)
आगंतुक पटल : 206
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam