पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विसाव्या आसियान -भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 07 SEP 2023 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 सप्‍टेंबर 2023

 

महामहिम, राष्ट्रपति जोको विडोडो,

नमस्कार

आपल्या मैत्रीपूर्ण भागिदारीला आता चार दशके पूर्ण होत आहेत

अशा प्रसंगी भारत– आसियान शिखर संमेलनात सहअध्यक्षपद भूषविणे,ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची पर्वणी आहे

या संमेलनाच्या या शानदार सोहळ्याच्या आयोजनासाठी राष्ट्रपति विडोडो यांचे मी मनापासून अभिनंदन करत आहे आणि त्यांचे आभार व्यक्त करत आहे.

तसेच आसियान समूहाच्या उत्कृष्ट अध्यक्षपदासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन.

कंबोडियाचे पंतप्रधान महामहीम ‘हुन मानेट’ यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे त्याबद्दल मी त्यांचेही हार्दिक अभिनंदन करतो

या बैठकीला निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले तिमोर लेस्तेचे  पंतप्रधान महामहीम "सेनाना गुज़माओ” यांचेही मी मनःपूर्वक स्वागत करतो.

आदरणीय महामहीम ,

भारत आणि आसियान यांना ऐतिहासिक तसेच भौगोलिक रूपाने ही जोडलेले  आहे.

त्याचबरोबर क्षेत्रीय एकता,शांति, समृद्धि, आणि विश्वाच्या बहुविध स्वरुपावरील असलेल्या आपल्या दोघांची असलेली  श्रध्दा त्यानेही आपल्याला एकमेकांसोबत जोडले आहे.

आसियान हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा (Act East Policy) चा प्रमुख स्तंभ आहे.

आसीयान देशांची केंद्रीयता आणि इंडो-पॅसिफिक वरील आसीयानचा दृष्टीकोन यांचे भारत संपूर्ण समर्थन करत आहे.

भारताच्या हिंद प्रशांत पुढाकारात ही आसीयान क्षेत्राला  प्रमुख स्थान दिले आहे.

गतवर्षी आम्ही भारत-आसियान मैत्रीवर्ष साजरे केले आणि आपल्यातील, संबंधांना एका 'सर्वसमावेशक रणनैतिक भागिदारीचे' स्वरूप दिले आहे.

आदरणीय महामहीम

आजच्या या वैश्विक अनिश्चितततेच्या वातावरणात सुध्दा आपल्यातील सहयोग प्रत्येक क्षेत्रांत प्रगती साध्य करत आहे. हेच आपल्या मैत्रीचे सामर्थ्य आणि लवचिकतेचे द्योतक आहे.

या वर्षीच्या आसियान संमेलनाची संकल्पना आहे आसियान-मैटर्ज़ -विकासाचा केंद्रबिंदू

आसियानचे महत्व असे आहे, की इथे प्रत्येकाची गोष्ट ऐकून घेतली जाते, आणि वैश्विक विकासात  आसियान क्षेत्राची महत्वपूर्ण भूमिका आहे म्हणून आसियान हा विकासाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

वसुधैव कुटुंबकम– एक पृथ्वी,एक कुटुंब, एक भवितव्य ही भावनाच भारताच्या जी-20 अध्यक्षतेची संकल्पना आहे.

महोदय,

एकविसावे शतक हे आशियाचे शतक आहे.आपल्या सर्वांचे शतक आहे 

म्हणून कोविडपश्चातचे विश्व एका नियमाधिष्ठीत धारणेतून निर्माण होणे आवश्यक आहे तसेच मानवकल्याणासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.

मुक्त आणि खुल्याप्रकारच्या  हिंद - प्रशांत प्रगतीसाठी; आणि ग्लोबल साउथ चा आवाज बुलंद करण्यातच आपल्या सर्वांचे हित निगडित आहे.

आज आपल्या एकत्रित चर्चेतून भारत आणि आसियान क्षेत्राच्या भावी भविष्यासाठी आणि त्याला सुदृढ़ बनविण्यासाठी नवीन संकल्प केले जातील; यावर माझा विश्वास आहे.

सिंगापुरचे प्रतिनिधी आगामी अध्यक्ष ,लावो पीडीआर  आणि आपण सर्वांसोबत, कार्य करण्यासाठी  भारत प्रतिबद्ध आहे.

खूप खूप धन्यवाद ।

 

* * *

Jadevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1955441) Visitor Counter : 151