माहिती आणि प्रसारण मंत्रालय

48 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील भारताचा सहभाग देशाच्या सृजनशीलतेचे दर्शन घडवणार


भारताला सृजनशीलतेचे केंद्र आणि कथाकारांची भूमी म्हणून सादर करण्याचा आणि देशात सुलभ चित्रीकरणाला प्रोत्साहन देण्याचा भारतीय प्रतिनिधी मंडळाचा प्रयत्न

Posted On: 06 SEP 2023 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2023

 

या वर्षीच्या मे महिन्यात 76 व्या कान चित्रपट महोत्सवातील यशस्वी सहभागा नंतर, 7 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या 48 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (टीआयएफएफ) आपले चित्रपट घेऊन जाण्यासाठी भारत सज्ज आहे. यावर्षी, भारताला प्रतिभा, आशय आणि मनोरंजनाचे केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यावर विशेष भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव (चित्रपट), आणि भारतीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार, टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत असलेल्या भारताच्या अधिकृत शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. भारतीय चित्रपट विकास महामंडळ ही माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारताचा सहभाग आयोजित करणारी नोडल एजन्सी  आहे.

आपल्या सहभागा दरम्यान, भारत देशाच्या सृजनशील आणि तांत्रिक सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी अनेक सत्रे घेईल आणि आंतरराष्ट्रीय भागधारकांना भारताबरोबर सह-निर्मिती करण्यासाठी आणि भारतामधील विविध स्थळांवर चित्रीकरण करण्यासाठी आमंत्रित करेल. ‘या, भारतात चित्रपट बनवा’, या विषयावरील विशेष सत्राच्या माध्यमातून भारताची चित्रपट विषयक धोरणे, आंतरराष्ट्रीय समुदायासमोर  प्रदर्शित केली जातील. भारतामधील चित्रीकरण सुलभ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासाठी भारतात  एक खिडकी यंत्रणा  करण्यात येईल.भारत आणि कॅनडाचे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील यश साजरे करण्यासाठी दोन्ही देश फीचर, शॉर्ट फिल्म्स, अॅनिमेशन प्रोजेक्ट्स, ओटीटी कंटेंट आणि वेब प्रोजेक्ट्स यांसारख्या माध्यमांमध्ये चित्रपट निर्मितीची क्षमता आजमावण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देऊ इच्छितात. यामध्ये एनएफडीसी  ओंटारियो क्रिएट्स, टेलिफिल्म कॅनडा, भारतीय निर्माते आणि कॅनेडियन निर्माते सहभागी होतील.

अहमदाबाद इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनने तयार केलेल्या इंडिया पॅव्हेलियनच्या उद्घाटनाने टीआयएफएफ मधला भारताचा सहभाग सुरू होईल.स्पॉटलाइट सत्रा व्यतिरिक्त, भारत ही कथाकारांची भूमी आहे, या संकल्पनेवरील सत्र आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांसह अनेक बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्षी टीआयएफएफ साठी सहा भारतीय चित्रपटांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. यामध्ये तरसेम सिंग धंडवार दिग्दर्शित डिअर जस्सी, निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित किल, करण बुलानी दिग्दर्शित थँक यू फॉर कमिंग, किरण राव दिग्दर्शित लॉस्ट लेडीज, जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित स्थळ/ए मॅच, आनंद पटवर्धन यांचा वसुधैव कुटुंबकम / जग हे कुटुंब आहे, या चित्रपटांचा समावेश आहे. सुसी गणेशन दिग्दर्शित 'दिल है ग्रे' हा चित्रपट मार्केट विभागा अंतर्गत प्रदर्शित होणार आहे.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1955287) Visitor Counter : 123