कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केन्द्र सरकारद्वारे 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान राबवल्या जाणाऱ्या 3.0 या विशेष मोहिमेच्या तयारीचा केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी घेतला आढावा


अधिक स्वच्छता आणि प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी 3.0 ही विशेष मोहीम 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सरकार राबवणार.

मोहिमेचे समन्वय आणि संचालन करण्यासाठी नोडल विभाग म्हणून प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग पाहणार काम

केन्द्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या सर्व कार्यालये/संस्थांमध्ये राबवली जाणार मोहीम

सेवा वितरण करणाऱ्या किंवा जनतेशी थेट संपर्क असलेल्या, क्षेत्रीय/मुख्यालयापासून दूर असलेल्या कार्यालयांकडे दिले जाणार विशेष लक्ष

Posted On: 05 SEP 2023 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2023

 

  1. केन्द्र सरकारद्वारे, अधिक स्वच्छता आणि प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान राबवल्या जाणाऱ्या 3.0 या विशेष मोहिमेच्या तयारीचा, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री; पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री, डॉ जितेंद्र सिंह यांनी आढावा घेतला.
  2. केन्द्राने 2021 आणि 2022 मध्येही विशेष मोहिमा राबवल्या होत्या. त्याच धर्तीवर स्वच्छतेची प्रत सुधारणे आणि प्रलंबित कामांचा निपटारा करत त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी 3.0 ही विशेष मोहीम 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सरकार राबवणार आहे. सेवा वितरण करणाऱ्या किंवा जनतेशी थेट संपर्क असलेल्या, क्षेत्रीय/मुख्यालयापासून दूर असलेल्या कार्यालयांवर सरकार विशेष लक्ष केन्द्रीत करेल.
  3. मोहिम यशस्वी करण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदवावा असे पत्र कॅबिनेट सचिवांनी केन्द्र सरकारच्या सर्व सचिवांना पाठवले आहे. देशभरातील मोहिमेचे समन्वय आणि संचालन तसेच विशेष मोहीम 3.0 च्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) नोडल विभाग म्हणून काम करेल.
  4. सरकारने 2021 आणि 2022 मध्ये 2 ऑक्‍टोबर ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमांचाच ही मोहिम पुढला भाग आहे. देशभरातील एक लाखाहून अधिक सरकारी कार्यालयांनी 2022 मध्ये राबवलेल्या विशेष मोहिम 2.0 मध्ये भाग घेतला. या कार्यालयांनी एकत्रितपणे सुमारे 89.8 लाख चौरस फूट जागा स्वच्छ करुन त्यांचा उत्पादक वापर केला. भंगाराच्या विल्हेवाटीतून 370.83 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, 64.92 लाख फायलींचे पुनरावलोकन केले गेले, 4.56 लाख सार्वजनिक तक्रारींचे निवारण झाले, 8998 खासदारांच्या संदर्भांना उत्तरे दिली.
  5. DARPG ने विशेष मोहीम 3.0 राबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विशेष मोहीम 3.0 दोन टप्प्यात आयोजित केली जाईल:
    1. तयारीचा टप्पा (15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023); तयारीच्या टप्प्यात मंत्रालये/विभाग करतील:-
      1. मोहिमेसाठी कार्यालये/अधिकारी आणि कार्यकर्ते यांना एकत्रित करणे
      2. प्रत्येक प्रचार कार्यालयात नोडल अधिकारी नियुक्त करणे
      3. नोडल अधिकाऱ्यांसाठी मोहिमेतील त्यांच्या भूमिकेबद्दल प्रशिक्षणाची व्यवस्था करणे
      4. प्रलंबित कामे कोणती ते ठरवणे
      5. स्वच्छतेसाठी मोहिमेच्या ठिकाणांची निवड 
      6. विल्हेवाट लावल्या जाणार्‍या निरुपयोगी सामग्रीचे मूल्यमापन आणि त्यांच्या विल्हेवाटीसाठी प्रक्रिया अंतिम करणे.
    2. अंमलबजावणीचा टप्पा (2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023); अंमलबजावणी टप्प्यात मंत्रालये/विभाग करतील:-
      1. पूर्वतयारीच्या टप्प्यात निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे                
      2. नोंदींचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी मोहिमेचा वापर करणे
      3. मोहिमेदरम्यान विकसित सर्वोत्तम पद्धतींचे दस्तऐवजीकरण करणे
  6. https://scdpm.nic.in या SCDPM पोर्टलद्वारे मोहिमेच्या प्रगतीचे परीक्षण केले जाईल. मंत्रालये/विभागांचे नोडल अधिकारी त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्सद्वारे पोर्टलवर प्रवेश करतील आणि त्यांच्या मंत्रालयात मोहिमेची प्रगती दररोज सादर करतील. संपूर्ण मोहिमेच्या कालावधीत साप्ताहिक आधारावर DARPG चे सचिव, नोडल अधिकार्‍यांसह पुनरावलोकने घेतील. DARPG द्वारे कॅबिनेट सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालय यांना सादर करण्यासाठी मोहिमेच्या प्रगतीचा साप्ताहिक एकत्रित अहवाल तयार केला जाईल.
  7. अंतर्गत स्वच्छतेला संस्थात्मक रुप देणे आणि पडून राहणाऱ्या कामांच्या प्रमाणात घट करण्यासाठी सरकारने 2021 आणि 2022 मधे विशेष मोहिम राबवली. त्यात उत्तरोत्तर झालेल्या प्रगतीचे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी कौतुक केले. दिरंगाई, प्रलंबितता कमी करणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे त्याचे निरीक्षण करावे असेही ते म्हणाले.
  8. मोहिमेची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी युद्ध पातळीवर सेवा वितरण करणाऱ्या किंवा जनतेशी थेट संपर्क असलेल्या, क्षेत्रीय/मुख्यालयापासून दूर असलेल्या कार्यालयांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
  9. या विशेष मोहीम 3.0 मुळे कामासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण पद्धती आणि प्रणालीगत सुधारणा अपेक्षित आहेत.

 

* * *

S.Tupe/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1954816) Visitor Counter : 132