संरक्षण मंत्रालय

दोन दिवसांचा दौरा पूर्ण करून आयएनएस दिल्ली श्रीलंकेवरून रवाना

Posted On: 03 SEP 2023 6:29PM by PIB Mumbai

 

आयएनएस दिल्ली हे जहाज श्रीलंकेतील कोलंबो या बंदर असलेल्या शहराच्या दोन दिवसांच्या भेटीनंतर 3 सप्टेंबर 2023 रोजी तेथून रवाना झाले.

जहाजाच्या या बंदरातील मुक्कामादरम्यान, विविध क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासह अनेक परस्पर संवादविषयक उपक्रम जहाजाचे चालक दल आणि श्रीलंका नौदल (SLN) मधील कर्मचारी यांच्यात परस्पर हिताचे विषयांना धरून आयोजित केले गेले. क्रो बेटावरच्या समुद्रकिनाऱ्यावर एक स्वच्छता मोहीम श्रीलंका नौदल मधील पाहुण्या जहाजाच्या चालक दल आणि कर्मचार्‍यांनी संयुक्तपणे हाती घेतली होती. जहाजाने 200 हून अधिक एनसीसी कॅडेट्स आणि 500 इतर स्थानिक अभ्यागतांसाठी एक परिचय दौरा देखील केला.

आयएनएस दिल्लीच्या कमांडिंग ऑफिसरने पश्चिम नौदल कमांडच्या  (COMWEST) रिअर अॅडमिरल  सुरेश डी सिल्वा, यांच्याशी संवाद साधला आणि  श्रीलंकेत 1987-91 या कालावधीत भारतीय शांतता रक्षक सेनेच्या कारवाई दरम्यान ज्या भारतीय सैनिकांनी आपले प्राण दिले त्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ भारतीय शांतता रक्षक सेनेच्या (IPKF) स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

मित्र राष्ट्रांना आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरविण्याच्या भारताच्या 'आरोग्य मैत्री' उपक्रमाचा एक भाग म्हणून, श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी आयएनएस दिल्लीवर आयोजित स्वागत समारंभात श्रीलंका संसदेच्या माननीय अध्यक्षांना अत्याधुनिक आरोग्य मैत्री क्यूब सादर केले. हे वैद्यकीय क्यूब्स भीष्म प्रकल्प (BHISHM - Bharat Health Initiative for Sahyog Hita and Maitri) अंतर्गत स्वदेशात विकसित केले गेले आहेत. माननीय अध्यक्ष महोदयांव्यतिरिक्त, स्वागत समारंभाला अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि बंदरे, जहाजबांधणी आणि विमान वाहतूक मंत्री, ऍटर्नी जनरल, संरक्षण सचिव आणि तिन्ही सेवा प्रमुख उपस्थित होते.

या भेटीचा समारोप आयएनएस  दिल्ली आणि  श्रीलंका नौदलचे जहाज विजयबाहू यांच्यात समुद्रात पॅसेज एक्सरसाइज (PASSEX) करून झाला.

***

R.Aghor/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1954514) Visitor Counter : 127