संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदल प्रश्नमंजुषा - क्षितिजा पलीकडील प्रवास

Posted On: 02 SEP 2023 2:35PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, भारतीय नौदलाने विविध तळांवर आयोजित केलेल्या आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धांना राष्ट्रीय स्तरावरील शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा भारतीय नौदल प्रश्नमंजुषा (THINQ) मध्ये रूपांतरित केले होते. या वर्षी भारताने प्रतिष्ठित G20 चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, THINQ हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनला आहे आणि त्याचे G20 THINQ असे नामकरण केले आहे. हा कार्यक्रम नौदलाद्वारे G20 सचिवालयाच्या नेतृत्वाखाली आणि NWWA (नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन) सोबत भागीदारीत आयोजित केला जात आहे आणि त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दोन स्तर असतील.

G20 THINQ च्या राष्ट्रीय फेरीत इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे शालेय विद्यार्थी सहभागी होतील. या प्रश्नमंजुषेसाठी 11700 हून अधिक शाळांनी नोंदणी केली आहे.

दोन ऑनलाइन एलिमिनेशन अर्थात बाद फेऱ्या होणार आहेत, पहिली 12 सप्टेंबर 23 रोजी आणि दुसरी 03 ऑक्टोबर 23 रोजी. त्यानंतर 10 ऑक्टोबर 23 रोजी ऑनलाइन उपांत्यपूर्व फेरी होईल, ज्यामधून 16 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील ( प्रत्येक झोनमधून चार शाळा). उपांत्य फेरीचे स्पर्धक 17 नोव्हेंबर 23 रोजी एनसीपीए सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय उपांत्य फेरीसाठी मुंबई येथे एकत्र येतील. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया येथे 18 नोव्हेंबर 23 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अंतिम फेरीत अव्वल 08 संघात मुकाबला होईल. राष्ट्रीय फेरी पूर्ण झाल्यावर, सर्व अंतिम स्पर्धकांमधून दोन सर्वोत्तम स्पर्धकांची आंतरराष्ट्रीय फेरीत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली जाईल.

G20 THINQ च्या आंतरराष्ट्रीय फेरीत जगभरातील तरुण आणि कुशाग्र अशा G20 भागीदारांमधील स्नेहबंध मजबूत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व दिसेल. या फेरीत G20 आणि आणखी 9 देशांतील संघांचा सहभाग असेल, प्रत्येक संघात दोन विद्यार्थ्यांचा समावेश असेल. 16 राष्ट्रीय उपांत्य फेरीतील आणि आंतरराष्ट्रीय सहभागींसह सर्व प्रतिनिधींना त्यांच्या भेटीदरम्यान भारताचा वैविध्यपूर्ण वारसा आणि संस्कृती अनुभवण्याची संधी मिळेल आणि त्यांना देशातील विविध लोकप्रिय स्थळे आणि स्थानांची भेट घडवली जाईल. 22 नोव्हेंबर 23 रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

शाळांसाठी नोंदणी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि सर्व कार्यक्रम-संबंधित माहिती प्रदान करण्याकरिता, G20 THINQ साठी एक समर्पित संकेतस्थळ (www.theindiannavyquiz.in) सुरू करण्यात आले आहे.

01 डिसेंबर 23 रोजी भारताने ब्राझीलला G20 अधिकार सुपूर्द केल्यावर, G20 THINQ हा 22 डिसेंबरपासून आयोजित महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या मालिकेचा शेवटचा अध्याय असेल. हा भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील एक उल्लेखनीय समारोप समारंभ असेल जो जागतिक स्तरावर G20 च्या अद्वितीय कामगिरींची दखल ठरेल.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1954371) Visitor Counter : 140