अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2023-24 साठी जुलै 2023 पर्यंतचा केंद्र सरकारच्या जमाखर्चाचा मासिक आढावा

Posted On: 31 AUG 2023 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्ट 2023 

 

केंद्र सरकारचा जुलै 2023 या महिन्यापर्यंतचा दरमहा जमा खर्च एकत्रित करण्यात आला असून  त्यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालातील ठळक मुद्दे खालील प्रमाणे आहेत:-

केंद्र सरकारला जुलै 2023 पर्यंत 7,75,107 कोटी रुपये (वर्ष 2023- 24 च्या एकूण मिळकतीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 28.5%) प्राप्त झाले आहेत. यामध्ये करापोटी मिळालेला महसूल (केंद्र सरकारला मिळालेला एकूण महसूल) 5,82,585 कोटी रूपये, कराव्यतिरिक्तच्या महसूलापोटी मिळालेले 1,78,804 कोटी रूपये आणि कर्जाव्यतिरिक्तची भांडवली मिळकत म्हणून मिळालेले 13,718 कोटी रूपये यांचा समावेश आहे.  या कर्जाव्यतिरिक्तच्या भांडवली मिळकतीपैकी 8,253 कोटी रूपये कर्जाच्या वसुलीतून मिळाले आहेत तर 5,465 कोटीं रुपयांची विविध भांडवली मिळकत झाली आहे.

केंद्र सरकारने करातील वाट्याचे हस्तांतरण म्हणून राज्य सरकारांना आतापर्यंत, 3,09,521 कोटी रूपये दिले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीची ही रक्कम 1,08,413  कोटी रूपयांनी अधिक आहे.

केंद्र सरकारचा एकूण खर्च 13,80,700 कोटी रूपये (वर्ष 23-24 च्या एकूण मिळकतीच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 30.7%) आहे. त्यापैकी 10,63,621 कोटी रूपये महसूल खात्यावर झालेला खर्च असून भांडवल खात्यावरील खर्च 3,17,079 कोटी रुपये आहे. एकूण महसुली खर्चापैकी, व्याजाच्या देयकांवर  2,99,889 कोटी रूपये तर प्रमुख अनुदानांपोटी 1,40,996 कोटी रूपये खर्च झाले आहेत.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1953773) Visitor Counter : 156