अवजड उद्योग मंत्रालय

"उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना (पीएलआय) -आत्मनिर्भरतेतून उत्कृष्टतेकडे"चा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय उद्या करणार एका परिषदेचे आयोजन


केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे परिषदेच्या अध्यक्षस्थानी, पीएलआय योजनेच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी सर्व भागधारकांना एकत्र आणण्याचे परिषदेचे उद्दिष्ट

Posted On: 28 AUG 2023 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑगस्ट 2023

 

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने "उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना (पीएलआय) -आत्मनिर्भरतेतून उत्कृष्टतेकडे"चा आढावा घेण्यासाठी इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे उद्या 29 ऑगस्ट 2023 रोजी एक परिषद आयोजित केली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील.

पीएलआय योजनेच्या कामगिरीचे पुनरावलोकन करण्यासाठी पीएलआय-ऑटो ऍप्लिकेन्ट्स, पी एम ए , चाचणी एजन्सी अशा सर्व भागधारकांना त्यांचे ज्ञान आणि अनुभव सामायिक करण्यासाठी आणि सर्व समस्या आणि आव्हानांवर तोडगा शोधण्यासाठी एकत्र आणणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. या योजनेद्वारे उपलब्ध असलेल्या संधी समजून घेण्यावर कार्यक्रमाचा विशेष भर असेल.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने स्वच्छ गतिशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानासाठी एक जैवसंस्था विकसित करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मंत्रालयाने वाहन उद्योग क्षेत्रात विविध महत्वाकांक्षी कार्यक्रम कार्यान्वित केले असून वाहन उद्योग आणि वाहनांचे सुटे भाग उत्पादित करणाऱ्यांसाठी असलेली पी एल आय योजना ही त्यापैकी एक आहे (₹25,938 कोटी खर्च).  

या योजनांचा वरुन खालपर्यंत झालेला प्रभाव वाहन उद्योगाच्या वृद्धिवर सकारात्मक परिणाम करणारा असेल आणि 2030 पर्यंत भारतीय वाहनउद्योग जगात तिसऱ्या क्रमांकावर येईल. वाहन उद्योगातील पी एल आय ऑटो अर्जदारांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय महत्त्वपूर्ण भागधारकांपैकी एक मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भरतेतून उत्कृष्टता हे ध्येय साकार करण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय उद्योगांना सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. देशातील प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान (AAT) उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर स्थानिकीकरण आणि विकास करण्याचे उद्दिष्ट वाहन उद्योगाच्या पाठिंब्याशिवाय आणि वाढीशिवाय साध्य करणे शक्य नाही, अशी मंत्रालयाची विचारसरणी आहे. नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाला अनुकूल वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि महत्वाच्या उद्योगांना आर्थिक बळकट करण्याच्या उद्देशाने अर्थसहाय्य पुरवण्यासाठी केंद्र सरकार नैतिक जबाबदारी घेत आहे.

 

* * *

S.Tupe/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952993) Visitor Counter : 135