माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी भाषणांचा संग्रह - ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ चा खंड-2 आणि खंड-3 प्रकाशित
Posted On:
26 AUG 2023 4:37PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या हस्ते आज भोपाळमध्ये कुशाभाऊ ठाकरे आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या संग्रहाचा खंड एक आणि खंड दोन’चे प्रकाशन झाले. पंतप्रधान मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टप्प्यात, जून 2020 ते मे 2021 या काळातील आणि जून 2021 ते मे 2022 या काळातील प्रेरणादायी भाषणे आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने ही पुस्तके संकलित आणि संपादित केली आहेत.
यावेळी आपल्या भाषणात, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी अधोरेखित केले की पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भाषणे सातत्याने लोकांना प्रेरणा देणारी असतात.
त्यांच्या प्रत्येक भाषणात, सर्वांना काही ना काही शिकण्यासारखे असते. त्यांचे प्रत्येकच भाषण मौल्यवान मार्गदर्शनपर आशयसंपन्न असल्याने, या भाषणांमधून काही भाषणे निवडणे, अत्यंत आव्हानात्मक होते, असे ठाकूर म्हणाले.
या पुस्तकाच्या दुसऱ्या खंडात 86 आणि तिसऱ्या खंडात 80 प्रेरणादायी भाषणे समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे, त्यांच्या भाषणातील महत्त्वाच्या विषयांनुसार संकलित करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले. स्टार्टअप इंडिया, सुशासन, महिला शक्ती, राष्ट्रशक्ती, आत्मनिर्भर भारत, जय जवान, जय किसान, जय विज्ञान या विषयांवरील पंतप्रधानांच्या भाषणांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
तरुण आणि अभ्यासकांनी ही पुस्तके जरूर वाचावीत, असे आवाहन ठाकूर यांनी केले. यात जाणून घेण्यासारखे आणि शिकण्यासारखे बरेच काही आहे. आपल्या भाषणात ते म्हणाले की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या विक्रम लँडरचे लँडिंग ही देशासाठी एक मोठी उपलब्धी आहे आणि ती जगात प्रथमच घडली आहे. UPI आणि BHIM अॅप सारख्या अॅप्सचा संदर्भ देत ते म्हणाले की डिजिटल पेमेंटच्या विश्वात आता सर्वाधिक 46 टक्के व्यवहार भारतात होतात. आता भारतातील युवा रोजगार देणारे लोक ठरले आहेत. जगाच्या तुलनेत, भारतात सर्वाधिक म्हणजे एक लाख पेक्षा अधिक स्टार्टअप कंपन्या आहेत.
जगातील सर्वात स्वस्त डेटा आता भारतात उपलब्ध आहे, भारताने स्वतःचे 5G तंत्रज्ञान बनवले आहे आणि भविष्यात 6G तंत्रज्ञान बनवणार आहे. अमृतकालच्या काळात भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. पूर्वी मध्य प्रदेशला ‘बिमारू राज्य’ म्हटले जात होते, परंतु नवीन सरकार आल्यानंतर मध्य प्रदेश हे आघाडीचे राज्य बनले आहे, असेही ठाकूर म्हणाले.
मातृभाषेतून शिक्षणाच्या क्षेत्रात आपण पुढे जात असून केवळ मध्य प्रदेशात वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम हिंदीतून तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिका आणि कमवा, ही सरकारची अत्यंत आगळीवेगळी योजना असून त्या अंतर्गत, आतापर्यंत 86 हजारांहून अधिक नोंदणी करण्यात आली आहे. मध्य प्रदेशने खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचेही यशस्वी आयोजन केले होते, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी युवकांना आवाहन केले की त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे. हे पुस्तक म्हणजे एक अमूल्य खजिना आहे, यातून तुम्हाला ज्ञानाचे मोती मिळतील, असे ते म्हणाले. पंतप्रधानांची मन की बात, ‘जन जन की बात’ असते, असे ते म्हणाले. 'मन की बात' सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांचा 'मन की बात' हा एक अद्भुत उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी पंतप्रधान म्हणून वर्णन करताना त्यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींचा संदर्भ दिला. देशाला नवी उभारणी देण्याच्या कार्यात,पंतप्रधानांची कल्पनाशक्ती दिसून येते, असे चौहान म्हणाले. इंदूरला देशभरातील स्मार्ट शहरांच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीचा पुरस्कार मिळाला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच इंडिया स्मार्ट सिटी पुरस्कारात, मध्यप्रदेशाला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले. या आधी, स्वच्छता सर्वेक्षणातही इंदूरला पहिले स्थान मिळत असे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी स्वागतपर भाषण केले. यानंतर पुस्तकांवर आधारित लघुपट प्रदर्शित करण्यात आला. प्रकाशन विभागाच्या महासंचालिका अनुपमा भटनागर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी केंद्रीय संचार विभागातर्फे '9 वर्षे: सेवा सुशासन आणि गरीब कल्याण' तसेच 'न्यू इंडिया: सशक्त भारत' या संकल्पनेवर आधारित मल्टी-मीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन, अनुराग सिंह ठाकूर आणि शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते झाले. यानिमित्त प्रकाशन विभागाच्या स्टॉलवर पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.
***
M.Pange/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1952510)
Visitor Counter : 128