गृह मंत्रालय

“कोणत्याही परिस्थितीत आपल्या लोकांसोबत उभा असतो, तोच खरा नेता असतो” - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

Posted On: 26 AUG 2023 2:39PM by PIB Mumbai

 

कोणत्याही परिस्थितीत आपल्या लोकांच्या पाठीशी उभा असतो, तोच खरा नेता असतो, असे, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. X वर केलेल्या ट्वीटमालिकेत गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ग्रीसहून थेट बंगरुळू येथे गेले आणि इस्रोमध्ये जाऊन, भारताचे चांद्रयान मिशन यशस्वी करणाऱ्या वैज्ञानिकांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी वैज्ञानिकांसमोर केलेल्या प्रेरणादायी भाषणात, भारताची अभिमानास्पद कामगिरी आणि आकाशाला गवसणी घालणारी यशोगाथा यांचे वर्णन केले, असे अमित शाह म्हणाले. 

चांद्रयान अभियान यशस्वी झाले, तो 23 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिनम्हणून जाहीर केला आहे, जेणेकरून या अभियानाच्या मागची यशोगाथा पुढच्या पिढ्यांपर्यंतही पोहोचावी. हा निर्णय, पुढच्या वैज्ञानिकांना अवकाश संशोधनात नवी ऊंची गाठण्यासाठी, तिरंग्याची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

भारताच्या चांद्रयान अभियानाच्या ऐतिहासिक यशानंतर आपल्या वैज्ञानिकांनी काळाच्या पडद्यावर आपला कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे. असे अमित शाह पुढे म्हणाले. हे यश साजरे करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान - 3 ज्या ठिकाणी उतरले, त्या जागेला शिवशक्तीअसे नाव तर चांद्रयान-2 ज्या ठिकाणी उतरले, त्या जागेला तिरंगाअसे नाव दिले असून, त्यामुळे कोणतेही अपयश कायमस्वरुपी नसतेअसा संदेश आपल्याला सदैव मिळत राहील, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

***

M.Pange/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952501) Visitor Counter : 110