पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावरून परतल्यावर लगेच 26 ऑगस्ट रोजी बंगळूरू येथे इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कला देणार भेट
चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी झालेल्या इस्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांशी पंतप्रधान साधणार संवाद
Posted On:
25 AUG 2023 7:59PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7:15 वाजता बंगळूरू येथे इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC) येथे भेट देतील. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावरून परतल्यावर लगेचच ते बंगळुरू येथे रवाना होतील.
चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी झालेल्या इस्त्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांची पंतप्रधान भेट घेतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. चांद्रयान-3 मोहिमे द्वारे आतापर्यंत हाती आलेली माहिती आणि या अभियानाची प्रगती याबाबत पंतप्रधान मोदी यांना यावेळी माहिती दिली जाईल.
***
S.Bedekar/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1952292)
Visitor Counter : 109
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam